(प्रतिकात्मक छायाचित्र)
सायप्रस : मृत्यू आणि त्याबाबतचे रहस्य हे अनेकदा पुढील अनेक वर्षांनी उलगडले जातात. असाच एका आश्तर्यकारक प्रकार सायप्रसमध्ये समोर आला आहे. मिररमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एका व्यक्तीचा मृत्यू १९७४ मध्ये झाला होता, पण त्याचा मृतदेह कधी सापडला नाही.
पण आता अनेक वर्षांनी जिथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्या गुहेत एक झाड उगवलं आहे. लोकांना याची उत्सुकता निर्माण झाली होती की, हे झाड इथे कसं उगवलं. अनेक शोधानंतर हे स्पष्ट झालं की, मृत व्यक्तीच्या पोटामध्ये अंजीराच्या बीया होत्या, त्यातून हे झाड निघालं.
अहमट हरयुन्डर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू ग्रीक आणि तुर्की यांच्यात होत असलेल्या संघर्षादरम्यान झाला होता. त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला, पण सापडला नाही. काही वर्षांनी गुहेमध्ये एक झाड लागलं आणि लोकांना प्रश्न पडला. कारण त्या परिसरात या खास प्रजातीचं झाड लागत नाही. संशोधकांच्या एका टीमने २०११ मध्ये यावर शोध सुरु केला आणि जे समोर आलं ते आश्चर्यकारक होतं.
शोधादरम्यान झाडाच्या आजूबाजूला खोदकाम केलं गेलं आणि तेव्हा इथे मृतदेह असल्याचं समोर आलं. तसेच गुहेच्या आजूबाजूला आणखीही काही मृतदेह गाडले असल्याचं उघड झालं. शोधादरम्यान याचीही माहिती मिळाली की, ही गुहा डायनामाइटने उडवण्यात आली होती आणि त्यातच अहमटसोबत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
अभ्यासकांचं म्हणनं आहे की, गुहेमध्ये झालेल्या स्फोटामुळे गुहेला काही छिद्रे पडली. त्यातून सूर्याचा प्रकाश आणि पावसाचं पाणी गुहेत येऊ लागलं. अभ्यासकांचं म्हणनं आहे की, शक्य आहे की, अहमटच्या पोटात काही बिया असतील. गुहेमध्ये सूर्य प्रकाश आल्याने त्या बियांना फुलण्यासाठी संधी मिळाली आणि त्यातून झाड लागलं.