राजस्थानच्या राजकीय संकटाचा नाटकीय अंत जवळ आला आहे. राजस्थानमध्ये सरकार वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या काँग्रेससाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरला. सचिन पायलट यांनी त्यांच्या बाजूनं असलेल्या आमदारांसह अशोक गहलोत यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. पण, सोमवारी अचानक राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांच्या बंडाची धार बोथट झाली आहे. पायलट यांनी तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. राजस्थानच्या या राजकीय घडामोडीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला.
साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन
पत्नीसोबत ड्राईव्हसाठी बाहेर पडला रवींद्र जडेजा; मास्कवरून महिला पोलिसांसोबत हुज्जत
गोएंका यांनी 10 ऑगस्टला हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात दोन व्यक्तींमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगताना पाहायला मिळत आहे. काही वेळानंतर दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यासाठी चढाओढच सुरू होते. या प्रयत्नांत मुलगी जोरदार आपटते. मुलगा खुर्ची घेऊन पळ काढतो. गोएंकानं त्यावर लिहिलं की,'राजस्थानचे राजकारण...!' हा व्हीडिओ 90 हजारांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे आणि 4 हजार लाईक्स व 700 रिट्विट मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ...
नवी दिल्ली/जयपूर - गेल्या महिनाभरापासून राजस्थानमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे. दरम्यान, राजस्थानमधील आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात बंड करण्यामागचं कारण सचिन पायलट यांनी आता सांगितले आहे.
''मी कधीही कुठल्याही पदाबाबत बोललो नाही. मी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होती. माझ्या मनात कुठल्याही व्यक्तीबाबत द्वेषभावना नाही. आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन,'' असे सचिन पायलट यांनी सांगितले. राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आल्यानंतर आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पायलट यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार
Video : 140 किलोच्या रहकीम कोर्नवॉलच्या नावावर आहे CPLमधील 'वजन'दार विक्रम!
कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!
संधी मिळाल्यास अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नक्की येईन; पाकिस्तानी क्रिकेटपटूची इच्छा