(प्रातिनिधिक छायाचित्र)
सोशल मीडियावर गायीच्या एका नुकत्याच जन्माला आलेल्या बछड्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या बछड्याला दोन तोंड आहेत. आणि दोन्ही तोंड वेगळे आहेत. या अजब बछड्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक वैज्ञानिक स्टडी करण्यासाठी पोहचत आहेत. या बछड्याचा जन्म रशियातील खाकासियातील मटकेचिक गावात झाला आहे.
व्हायरल फोटोत गुलाबी रंगाचे दोन तोंड दिसत आहेत. त्याच्या दोन्ही तोंडातून जीभ बाहेर आली आहे. स्थानिक लोकांनी सांगितलं की, बछड्याचा जन्म होताच मृत्यू झाला होता. तसेच काही दिवसांनी या बछड्याला जन्म देणाऱ्या गायीचाही मृत्यू झाला होता.
खाकासियाच्या कृषी आणि खाद्य मंत्रालयाने २५ ऑक्टोबरला सांगितलं की, अशी एक घटना एका खाजगी फार्मस्टेडमद्ये बेयस्की जिल्ह्यातील मटकेचिक गावात झाली होती. मालकानुसार, बछडा मृत जन्माला आला होता आणि गायीचं हे पहिलंच बछडं होतं.
चिकित्सा विभागाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, प्राण्यांचं आनुवांशिक असमानतेमुळे जन्माला येण्याचं मुख्य कारण जीनोममधील बदलामुळे असतं. गेल्यावर्षी चीनमध्ये दोन तोंड असलेल्या बछड्याने जन्म घेतला होता. त्याचा फोटोही व्हायरल झाला होता.