या व्हिडीओमध्ये एक रहस्यमय धातुचा खांब दिसतो आहे. अमेरिकेतील वाळवंट उटाहमध्ये हा खांब दिसून आला आहे. हा एक धातुचा चमकदार खांब आहे. पण हा खांब इथे कसा आला याचा कुणालाही काहीच पत्ता नाही. पण सोशल मीडियावरील या खांबाने खळबळ उडवून दिली आहे. हा चमकदार त्रिकोणी खांब दक्षिण उटाहतील लाल डोंगराजवळ आढळून आलाय. लोक गमतीने हे एलियनने इथे ठेवल्याचं म्हणत आहेत.
या खांबाबाबत तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात आली. त्यातून समोर आलं की हा धातू मोनोलिथ आहे. पण हे अजूनही समोर येऊ शकलं नाही की, हे मोनोलिथ इथे कुणी ठेवलं. एजन्सीने सोमवारी एक पत्र जारी केलं आहे. त्यात सांगण्यात आलं आहे की, प्रतिबंधित सार्वजनिक जमिनीवर अशाप्रकारे काहीही ठेवणं अवैध आहे. याने काहीही फरक पडत नाही की, तुम्ही कोणत्या ग्रहावरून आहात.
या रहस्यमय खांबाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. वेगवेगळे तज्ज्ञ यावर विचार करत आहेत. पण हा खांब कुठून आला, कुणी ठेवला काहीही समजू शकलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं कुणी हा खांब तिथे ठेवला असेल?