शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:17 PM

तुम्ही पाण्याने खळखळून वाहणाऱ्या अनेक नद्या पाहिल्या असतील, पण कधी तुम्ही अशा नदीबाबत ऐकलंय का ज्यात पाण्याऐवजी दगडंच दगडं असतील.

तुम्ही पाण्याने खळखळून वाहणाऱ्या अनेक नद्या पाहिल्या असतील, पण कधी तुम्ही अशा नदीबाबत ऐकलंय का ज्यात पाण्याऐवजी दगडंच दगडं असतील. तुम्हाला  विश्वास बसणार नाही, पण रशियामध्ये एक अशीच नदी आहे. या कारणानेच दगडाच्या या नदीला स्टोन रिव्हर किंवा स्टोन रन असं म्हटलं जातं.

ही नदी निसर्गाचा हा करिश्माच आहे. पण या नदीचं रहस्य वैज्ञानिक अजूनही उकलू शकले नाहीत. या नदीत जवळपास सहा किलोमीटरपर्यंत तुम्हाला केवळ दगडच दगड दिसेल. हे दगड बघण्यासाठी एखाद्या नदीच्या धारेसारखेच वाटतात. २० मीटर छोट्या धारेपासून ते कुठे कुठे ही नदी २०० ते ७०० मीटर मोठी धारेचं रूप घेते.

या अनोख्या नदीमध्ये छोट्या छोट्या दगडांपासून ते मोठाले दगड आहेत. साधारण येथील १० टन वजनी दगड चार ते सहा इंच जमिनीत रूतलेले आहेत. हेच कारण आहे की, इथे कोणत्याही प्रकारची वनस्पती उगवत नाही. तर नदीच्या आजूबाजूला देवदारची उंचच उंच झाडे आहेत.

आता तुम्ही विचार करत असाल की, हे इतके दगड आले कुठून आणि त्यांनी नदीचं रूप कसं धारण केलं? यावर काही वैज्ञानिकांचं मत आहे की, साधारण १० हजार वर्षांआधी उंच डोंगरावरून ग्लेशिअर तुटून खाली पडले, ज्यामुळे ही अनोखी नदी तयार झाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सrussiaरशिया