जगभरात अनेक अजब घटना घडत असतात. ज्या देश-विदेशातही चर्चेत असतात. या घटना इतक्या अनोख्या असतात की, त्यांवर सहजासहजी विश्वास बसत नाही. अशीच एक अनोखी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक असं ठिकाण आहे जिथे जास्तीत जास्त जुळी मुले जन्माला येतात.
हे ठिकाण भारतातील केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या कोडिन्ही गावात आहे. या गावाच्या वेगळेपणाची चर्चा परदेशातही केली जात आहे. अनेकदा या गावातील जुळ्या मुलांना बघण्यासाठी दुरदुरून लोक येतात. गावात जास्तीत जास्त परिवारात जुळे मुलेच जन्माला येतात. पण असं कसं होतं? याचा शोध घेण्यासाठी अनेकदा वैज्ञानिकांच्या टीम या गावात आल्या. पण ते यावरून पडदा उठवू शकले नाहीत. (हे पण वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....)
येथील स्थानिक लोकांचं मत आहे की, या गावावर देवाची विशेष कृपा आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त मुलं जुळी जन्माला येतात. गेल्या ५० वर्षात या गावात साधारण ३०० पेक्षाही जास्त जुळ्या बाळांनी जन्म घेतला. ज्याची चर्चा आजही देश-विदेशात होते. (हे पण वाचा : बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या)
जर तुम्ही कोडिन्ही गावात गेलात तर तुम्ही भेट मोठ्या प्रमाणात जुळ्या लोकांशी होते. काही अंदाजांनुसार या गावात साधारण ४०० जुळे लोक राहतात. या रहस्यमय गोष्टीवरून पडदा उठवण्यासाठी २०१६ मध्ये या गावात एक टीम आली होती. त्यांनी गावातील जुळ्या लोकांचे सॅम्पल्स घेतले.
पण रिसर्चमधूनही ठोस असा काही निष्कर्ष निघाला नाही. अनेक लोक म्हणाले की, या गावाच्या हवा-पाण्यात असं काही असेल ज्यामुळे इथे जास्त जुळी मुलं जन्माला येतात.
इतकंच नाही तर काही वैज्ञानिकांनी इथे राहणाऱ्या लोकांच्या खाण्या-पिण्याचा आणि राहणीमानाचाही अभ्यास केला. त्यानंतरही त्यांच्या हाती काही लागलं नाही. गावात इतके जुळे मुलं का जन्माला येतात हे आजही रहस्य बनून आहे.