2020 या वर्षात इतकं काही बघायला मिळालं की आता कशाचं फार आश्चर्य वाटणार नाही. पण सध्या सोशल मीडियात एका कारच्या फोटोची फारच चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियातील एडिलेडची ही घटना आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इथे एअरपोर्टवर एक कार उभी आहे. या कारच्या नंबर प्लेटवर लिहिलंय 'Covid 19'.
एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही कार कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या आधीपासून ही कार एडिलेड एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये उभी आहे. Steven Spry हे एअरपोर्टचे वर्कर आहेत. त्यांनीच हा फोटो एबीसी न्यूजकडे पाठवला. त्यांनी सांगितले की, एक ग्रे बीएमडब्ल्यू उभी आहे. या कारच्या नंबर प्लेटवर Covid 19 लिहिलं आहे.
Spry यांनी सांगितले की, लॉकडाऊनपासून एअरपोर्टच्या कार पार्किंगमध्ये अनेक कार्स पार्क आहेत. पण ही कार कदाचित फेब्रुवारीपासून इथे उभी आहे. त्यांनी सांगितले की, आधी तर कारवर एक कव्हर होतं. पण नंतर एप्रिलच्या आसपास आलेल्या वेगवान हवेमुळे कव्हर थोडं बाजूला झालं. तेव्हा नंबर प्लेटवर Covid 19 लिहिलेलं दिसलं. आता कर्मचाऱ्यांमध्ये ही कार चर्चेचा विषय ठरली आहे.
Spry यांच्यानुसार, ही कार एखाद्या पायलट असू शकते. कदाचित तो कुठे फ्लाइट घेऊन गेला असेल आणि तिकडेच अडकून पडला असेल. तेच एबीसीच्या रिपोर्टनुसार, या कारची लायसेन्स प्लेट २६ सप्टेंबर २०२० पर्यंत रजिस्टर आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात कस्टम नंबर प्लेट मिळतात. असा अंदाज आहे की, ही कार मार्च महिन्यापासून इथे उभी आहे. पण अजून हे समजू शकलं नाही की कार कुणाची आहे.
शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...