शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

या बेटावर आजही वापरली जातात दगडांची नाणी, फार पूर्वीपासून चालू आहे प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:55 AM

Stone Coins : आता सगळीकडे नोटांचं चलन सुरू झालं. जगभरात नोटांचा आणि नाण्यांच्या वापर केला जातो. पण आजही एक ठिकाण असं आहे जेथील करन्सी दगड आहे आणि हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.

Stone Coins : मुद्रेचा वापर मनुष्य पूर्वीपासून खरेदी-विक्रीसाठी करत आले आहेत. फक्त काळानुसार मुद्रेचं स्वरूप बदलत गेलं. एका काळात महागड्या रत्नांद्वारे व्यवसाय होत होता. लोक मोती, रत्न देऊ वस्तू खरेदी करायचे. नंतर नाण्यांचं चलन सुरू झालं. सोने, चांदी, तांबे, कांस्य आणि अ‍ॅल्यूमिनिअमपासून तयार केलेली नाणी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वापरण्यात आलीत. आता सगळीकडे नोटांचं चलन सुरू झालं. जगभरात नोटांचा आणि नाण्यांच्या वापर केला जातो. पण आजही एक ठिकाण असं आहे जेथील करन्सी दगड आहे आणि हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, प्रशांत महासागरातील मायक्रोनेशियामध्ये यप नावाचं बेट आहे. या छोट्याशा बेटावर एकूण ११ हजार लोक राहतात. पण या शहराचं नावलौकिक इतकं आहे की, ११ व्या शतकातील इजिप्तच्या एका राजाकडून यपचा उल्लेख आढळतो. तसेच आणखीही काही लोकांनी यपबाबत सांगितलं आहे. या लोकांनी कुठेही 'यप' नावाचा उल्लेख केला नाही. पण जिथे दगडाच्या करन्सीचा वापर होतो, असा उल्लेख आहे.

घनदाट जंगलं, दलदल असा चित्र असलेल्या या बेटावर जाण्यासाठी दिवसातून केवळ एकच फ्लाइट आहे. विमानतळाच्या बाहेर येतात लहान-मोठे दगड दिसतात. या दगडांच्या मधोमध छिद्र दिसतात. या बेटावरील माती भुसभुशीत आहे. पण तरिही इथे दगडाच्या करन्सीचं चलन पूर्वीपासून आहे. 

आता ही करन्सी वापरणं कधी सुरू झालं हे कुणालाही माहीत नाही. पण स्थानिक लोक सांगतात की, पूर्वी येथील लोक चारशे किलोमीटर दूर डोंगरावरून हे दगड कापून आणायचे. या दगडांना राई म्हटलं जातं. पुढे १९व्या शतकात हे ठिकाण स्पेनच्या ताब्यात गेलं तेव्हाही दगडांचा व्यवहार काही थांबला नाही. आज केवळ नावाला या ठिकाणी अमेरिकन डॉलरचा वापर होतो. कारण येथील लोकांच्या मनात दगडांचं वेगळं महत्त्व आहे.

आज या दगडांच्या या करन्सीचा वापर लोक रोजच्या देवाण-घेवाणीसाठी करत नाहीत. पण यांचा वापर माफीनामे किंवा कधी लग्नसंबंध मजबूत करण्यासाठी हे दगड दिले जातात. दगडांच्या या नाण्यांचा आकार सात सेंटीमीटर ते ३.६ मीटर इतका असतो. यांचं मूल्य ते कोणत्या कामासाठी वापरले जातात किंवा कुणाला दिले जातात यावरून ठरतं. 

गेल्या २०० वर्षांपासून दगडांच्या करन्सीचा इतिहास नव्या पिढीला तोंडी सांगितला जातो. आता दगडांची नाणी म्युझिअममध्ये ठेवली आहेत. आजही काही नवीन दगडांची नाणी तयार केली जातात. पण प्रमाण कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही नाणी चोरी जाण्याची भिती नाही. कारण यांचा आकारही मोठा आहे आणि चोरी करून नेणार कुठे असाही प्रश्न आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके