शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दोन इमारतींमधील अवघ्या ८ इंचाच्या जागेत अडकली महिला, बचावकार्यावेळी जे दिसलं ते धक्कादायक होतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 5:22 PM

महिलेची जेव्हा बचाव पथकामार्फत सुटका करण्यात आली तेव्हा तिची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला. त्यामुळे ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

जगात वेगवेगळ्या आणि अनोख्या घटना घडत असतात. नेमकं कुठे आणि काय घडेल याचा काही नेम नसतो. काहीवेळा तर अशा काही घटना समोर येतात की ज्यावर विश्वास ठेवणं अतिशय कठीण होऊन बसतं. असाच एक धक्कादायक प्रकार कॅलिफोर्नियामध्ये घडला आहे. कॅलिफोर्नियात एक महिला दोन इमारतींच्या मधील अवघ्या ८ इंचाच्या जागेत अडकली होती. पण महिलेची जेव्हा बचाव पथकामार्फत सुटका करण्यात आली तेव्हा तिची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला. त्यामुळे ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. (Naked woman wedged in 8 inch space between 2 buildings know about shocking truth)

समोर आलेल्या माहितीनुसार, एक महिला हार्बर बुलेवार्ड स्थित एका ऑटो शॉप आणि कार स्टिरियो स्टोरच्या दोन भिंतीच्यामध्ये अडकली होती. त्यानंतर ती जोरजोरात ओरडून मदतीची याचना करत होती. परिसरात काम करणाऱ्या काही लोकांना या महिलेचा आवाज ऐकू येत होता. पण ती नेमकी कुठे आहे याचा काही ठावठिकाणा कळून येत नव्हता. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. पण तिची परिस्थिती पाहून त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं. "आमच्या दुकानाच्या मागच्या बाजूला एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज येत होता. ती मदतीसाठी हाक देत होती. त्यामुळे आम्ही पोलिसांना बोलावलं. मग पोलिसांनी दुकानावर चढून पाहिलं तर दोन भिंतीच्या मधल्या जागेत एक महिला विवस्त्र अवस्थेत अडकली होती आणि ती वेदनेनं विव्हळत होती", असं दुकान मालकानं सांगितलं. 

बचाव पथकानं शर्थीच्या प्रयत्नांनंतर संबंधित महिलेला सुखरुपरित्या बाहेर काढलं. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण इतक्या लहान जागेत ती कशी पोहोचली? आणि ती विवस्त्र अवस्थेत तिथं काय करत होती? तिच्यासोबत नेमकं काय घडलं? हे सर्वांसाठीच आता एक रहस्य बनलं आहे. अर्थात पोलिसांच्या चौकशीतून याबाबतचा अधिक खुलासा होऊ शकेल. 

टॅग्स :Californiaकॅलिफोर्नियाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल