बिहारच्या नालंदामधून 'एक फूल और दो माली' या हिंदी म्हणीला साजेशी अशी घटना समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून पती आणि दोन मुलांना सोडून फरार झालेली पत्नी प्रियकरासोबत बाजारात दिसली तेव्हा चांगलाच गोंधळ झाला. दोन व्यक्ती एकच महिला त्यांची पत्नी असण्याचा दावा करत होते. स्थानिक लोकांच्या सूचनेवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिघांना पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण महिलेला तिच्या प्रियकरासोबत रहायचं होतं.
ही घटना नालंदा जिल्ह्याच्या ढीवरीपर गावातील आहे. येथील बबलू कुमार आणि धीरेंद्र कुमार एक महिला आरती देवीवरून बाजारात भांडत होते. इतकंच नाही तर तिघांमध्ये पोलीस स्टेशनमध्येही अनेक तास ड्रामा सुरू होता.
बबलू कुमार (पहिला पती) म्हणाला की, 8 वर्षाआधी त्याचं लग्न आरती देवीसोबत झालं होतं आणि दोघांनी तीन मुले आहेत. एक वर्षाआधी नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमाला गेली होती. यावेळी तीन लेकरांचा पिता धीरेंद्र कुमार याच्यासोबत तिची भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते फोनवरही बोलत होते. दोघे प्रेमात पडले. त्यानंतर एक दिवस महिला मुलांना सोडून फरार झाली. ती नंतर धीरेंद्रसोबत राहू लागली.
दरम्यान महिला तिच्या प्रियकरासोबत एक दिवस बाजारात काही कामासाठी गेली होती. हे पहिल्या पतीला समजलं आणि तो सुद्धा तिथे पोहोचला. यानंतर तिघांमध्येही तिथे वाद सुरू झाला. वाद वाढलेला बघता स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं.
आरती म्हणाली की, तिला तिचा प्रियकर धीरेंद्रसोबत रहायचं आहे. तिचं पहिल्या पतीसोबत कोणतंही नातं नाही. तर पहिला पती बबलू कुमार म्हणाला की, तिच्याशिवाय राहता येणार नाही. महिलेचा प्रियकर धीरेंद्र सुद्धा विवाहित आहे आणि त्याला तीन मुलं आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरती विवाहित आहे आणि प्रेम प्रकरणामुळे 4 महिन्यांआधी ती फरार झाली होती. रविवारी ती बाजारात दिसली. दोन्ही परिवारांमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला आरतीला दुसरा पती धीरेंद्रसोबत रहायचं आहे. पण तिचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झालेला नाही. तर दुसरा पती विवाहित आहे. आता त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.