तसं तर अंतराळात जाणं फारच खर्चीक आणि धोकादायक काम असतं. पण आजकाल टेक्नॉलीजीच्या विकासामुळे वैज्ञानिकांना अंतराळात पाठवणं काही अवघड काम राहिलं नाही. पण तरी आजही त्यांना अंतराळात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे लोक पृथ्वीवर राहून जी रोजची कामे करतात ती अंतराळात जाऊन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
अशीच एक समस्या म्हणजे अंतराळात किंवा चंद्रावर सकाळची नैसर्गिक विधी करणे. यासाठी वैज्ञानिकांनी काहीना काही व्यवस्था केली आहेच. पण त्यात सुधारणा होण्याची आशा असतेच. अंतराळ एजन्सी नासाने आता एक असं टॉयलेट तयार करत आहेत जे बनवत असताना त्यांना 2 कोटी 29 लाख डॉलर म्हणजे जवळपास 189 कोटी रूपये खर्च येत आहे.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) ला हे टॉयलेट बनवण्यासाठी 2,29,25,970 अमेरिकन डॉलर लागत आहेत. हे टॉयलेट असं डिझाइन करण्यात आलं आहे की, अंतराळविरांना टॉयलेटला जाणं सोयीचं होईल. यात फ्लश सीट्स लावण्यात आल्या आहेत. आकाराने ते जरा लहान आणि हलके असतील. यात फुटरेस्ट आणि हॅंडल सुविधा आहे.
1960 दरम्यान जेव्हा अंतराळविरांना पाठवलं जात होतं तेव्हा स्थिती अशी होती की, त्यांना त्यांच्या स्पेससूटमध्येच टॉयलेट करण्यास सांगण्यात येत होतं आणि यामुळे शॉर्ट सर्किट झालं होतं. नंतर याला प्लास्टिक बॅगमध्ये कनेक्ट करण्यात आलं. पण अंतराळविरांसाठी हे तरीही सोयीचं नव्हतं. आता या नव्या टॉयलेटमुळे त्यांची सोय होईल. कारण सक्शनच्या माध्यमातून विष्ठा थेट कंटेनर्समध्ये स्टोर केली जाईल. आता हे टॉयलेट कधी तयार होईल ते बघणं महत्वाचं ठरेल.