मंगळ ग्रहावर जीवन शोधण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासा(NASA) कडून पाठवण्यात आलेलं शोधयान पर्सेवरेंस (Rover Perseverance) तिथे वेगवेगळे शोध करत आहे. यात तेथील मातीच्या टेस्टपासून ते तेथील वातावरणापर्यंतच्या रिसर्चचा समावेश आहे. अशात आता रोवरने मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज पहिल्यांदा रेकॉर्ड केला आहे. रोवरने नासाला या हवेच्या आजावाचा ऑडिओ पाठवला आहे.
रोवर पर्सेवरेंसकडून पाठवण्यात आलेल्या ऑडिओमध्ये ऐकलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे मंगळ ग्रहावर वेगवान वारे वाहत आहे. तेथील हवेचा आवाज तसाच वाटतो आहे जसा पृथ्वीवर वादळावेळी असतो. हा ऑडिओ नासाने ट्विटरवर शेअर केलाय. नासाने माहिती दिली की, हा आवाज रोवर पर्सेवरेंसमध्ये लावण्यात आलेल्या सुपरकॅम मायक्रोफोनने रेकॉर्ड केला आहे. हा रोवरच्या मास्टच्या वर लावला आहे. ( हे पण वाचा : ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ )
एका दुसरा ऑडिओ मेसेज रोवरने पाठवला आहे. हा तेथील लेजर स्ट्राइक्सचा आवाज आहे. हाही पहिल्यांदाच ऐकला गेला आहे. हा आवाज तसाच आहे जसा हृदय धडधडण्याचा येतो. या माध्यमातून नासाची टीम हे जाणून घेऊ शकते की, रोवरच्या आजूबाजूच्या डोंगरांची बनावट कशी आहे.
दरम्यान नासाच्या रोवर पर्सेवरेंसने लाल ग्रहावर पहिल्यांदा परीक्षण म्हणून आपलं अभियान ६ मार्च रोजी सुरू केलं होतं. यात जवळपास ६.५ मीटर अंतर पार केलं गेलं होतं. या रोवर या सुरूवातीला मोठं यश मानलं जात आहे.