अमेरिकन अंतराळ संस्था नासा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अंतराळातील आश्चर्यजनक फोटो आणि व्हिडिओ टाकत असते. आता परत एकदा नासानं इंस्टाग्रामवर अंतराळातील एक चकीत करणारा व्हिडिओ टाकला आहे. नासानं शेअर केलेला हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे.
नासानं वर्णनात्मक कॅप्शनसह एक व्हिज्युअलाइज्ड व्हिडिओ शेअर केला आहे. "दृश्यमान प्रकाशाद्वारे खगोलीय वस्तू पाहताना-मानवी डोळा पाहू शकणारा प्रकाश-धूळचे दाट ढग छायादार दिसू शकतात. या नेबूलाच्या आश्चर्यकारक, अलौकिक इच्छा पकडण्यासाठी, हबल स्पेस टेलिस्कोप इन्फ्रारेड लाइट बनतो'', असे कॅप्शन नासानं आपल्या पोस्टसह दिलं आहे.
पुढच्या काही ओळींमध्ये, नासानं व्हिज्युअलमध्ये दाखवलेल्या हॉर्सहेड नेबुलाचं वर्णन केले आहे. "ओरियन नक्षत्रात अंदाजे 1,500 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर असलेल्या, हॉर्सहेड नेबुला रात्रीच्या आकाशातील सर्वात ओळखण्यायोग्य निहारिकांपैकी एक आहे. हे वैज्ञानिक व्हिज्युअल नेबुलाच्या इन्फ्रारेड दृश्याद्वारे फ्लाइटचं अनुकरण करतें, तो आश्चर्यकारक वैश्विक चित्र जिवंत करतो'', असंही नासानं आपल्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत 56 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओवर युझर अनेक कमेंट्स करत आहेत.