फ्रान्सचे दिवंगत भविष्यवेत्ता द नास्त्रेदमस यांनी येणाऱ्या अनेक वर्षांसाठी फार पूर्वीच काही भविष्यवाणी केल्या आहेत. जगभरातील अनेक लोक त्यांच्या या भविष्यवाणींवर विश्वास ठेवतात आणि त्यांची नेहमीच चर्चा होत असते. कारण असं मानलं जातं की, त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. आता नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. या २०२० वर्षासाठी त्यांनी काय भविष्यवाणी करून ठेवली ते जाणून घेऊया....
नास्त्रेदमस यांनी २०२० साठी ज्या भविष्यवाणी केल्या आहेत, त्यात मानवतेसाठी चांगली बाब नाही. काही दुसऱ्या भविष्यवेत्त्यांनीही २०२० मध्ये विनाशाचे संकेत दिले आहेत. नास्त्रेदमस यांनी केलेल्या भविष्यवाणीत २०२० मध्ये जग नष्ट होण्याचे संकेत दडले आहेत. चला जाणून घेऊ काय म्हणाले होते ते....
नव्या युगाची सुरूवात
नास्त्रेदेमस यांच्यानुसार, २०२० मध्ये एका नव्या युगाची सुरूवात होईल. त्यांनी अंदाज लावलाय की, २०२० मध्ये अनेक देश एकमेकांमध्ये भिडतील. तसेच २०२० मध्ये आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक संकटही येईल. आकडेवारीनुसार, भारतासह जगभराची अर्थव्यवस्था फारशी चांगली नाही. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धाची सुरूवात झाली आहे. भारताच्या आर्थिक विकासात घट झाली आहे. मात्र, भविष्यवाणीत असंही सांगण्यात आलं आहे की, २०२० पर्यंत लोक आधीपेक्षा अधिक जागरूक होतील आणि लोकांमध्ये एक नविन प्रकारचा आध्यात्मिक झुकावही बघायला मिळेल.
तिसरं महायुद्ध
नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीनुसार, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता सिद्ध होऊ शकते. २०२० मध्ये अमेरिका आशियात सर्वात मोठा सैन्य अभ्यास सुरू करेल. लोक नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीकडे याला जोडून बघत आहेत. त्यांनी २०२० हे फार हिंसक वर्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिनीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्नही होऊ शकतो. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही नुकसान होऊ शकतं.
राणीचा मृत्यू
भविष्यवाणीनुसार, २०२० मध्ये ग्रेट ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू ही गेल्या ७० वर्षातील येथील सर्वात विनाशकारी घटनांपैकी एक असेल. भविष्यवाणीत असंही सांगण्यात आलं आहे की, महाराणीच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ग्रेट ब्रिटनची गादी सांभाळतील आणि लवकरत स्कॉटलॅंड व वेल्सचा दौरा करतील.
जलवायु परिवर्तन
नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीनुसार, यावर्षी जलवायु परिवर्तन संपूर्ण जगाला प्रभावित करेल आणि प्रदूषणाविरोधात युद्ध पातळीवर मोहिम सुरू करतील. काही देशांमध्ये भयंकर वादळ आणि भूकंप येतील तर काही ठिकाणी पूर आणि दहशतवादाने नुकसान होईल.
धार्मिक अतिवाद
तसेच मध्यपूर्व देशांमध्ये आणि जगातल्या काही भागांमध्ये धार्मिक अतिवाद वाढेल ज्याने शांतता भंग होईल आणि गृहयुद्ध सुरू होतील. अनेक लोकांना आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये शरण घ्यावी लागेल.
नास्त्रेदमस यांच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी
नास्त्रेदमस काही वर्षांपूर्वी मोदी युगाची भविष्यवाणी केली होती. डायनाचा मृत्यू, अॅडॉल्फ हिटलरचा उदय, अणुबॉम्ब, द्वितीय महायुद्ध आणि ९/११ बाबतची भविष्यवाणी खरी ठरली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पबाबतची त्यांची सांकेतिक भविष्यवाणीही खरी ठरल्याचे बोलले जाते.
काही अभ्यासकांनुसार, नास्त्रेदमस यांनी त्यांच्या निधनाबाबतची केलेली भविष्यवाणीही खरी ठरली होती. त्यांनी स्वत:बाबत भविष्यवाणी केली होती की, ते बेंच आणि बेडजवळ मृत आढळतील. त्यांनी त्यांच्या निधनाच्या एक रात्री आधीच सांगितलं होतं की, ते पुढची रात्र जिवंत राहणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बेडरूममध्ये टेबलवर मृत आढळले होते.