जगभरातील पाळीव कुत्र्यांचे वेगवेगळे कारनामे आपण नेहमीच ऐकत किंवा पाहत असतो. मात्र, नॉर्थ वेल्समध्ये एका कुत्र्याने केलेला कारनामा याआधी तुम्ही कधी ऐकला नसेल. हा कुत्रा ९ महिन्यांचा असून त्याचं नाव Ozzie आहे. हा कुत्रा लेब्राडूडल प्रजातीचा आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाचे १६० पाउंड्स(साधारण १४ हजार ५००) रूपये खाल्लेत. त्यानंतर मालिकाला कुत्र्याच्या पोटातून पैसे परत काढण्यासाठी १३० पाउंड(जवळपास १२ हजार रूपये) खर्च करावे लागले.
काय आहे प्रकरण?
नॉर्थ वेल्सला राहणारे जुडिथ(६४) आणि नील राइट(६६) खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यादरम्यान त्यांचा कुत्रा Ozzie घरी एकटाच होता. जेव्हा दोघेही खरेदी करून घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की, नोटांची तुकडे किचन आणि हॉलमध्ये पडलेले आहेत. तर एका कोपऱ्यात Ozzie बसलेला आहे. जूडिथ आणि नील यांच्या लक्षात आलं की, हा कारनामा त्यानेच केला आहे.
ओजीने पैसे काढले कुठून?
रिपोर्ट्सनुसार, ओजीला घराच्या लेटरबॉक्समधून एक पॅकेट मिळालं होतं. त्यातील २० पाउंडच्या नोटा त्याने फाडून खाल्ल्या. नीलने ते पॅकेट लेटरबॉक्समध्ये ठेवणाऱ्या व्यक्तीस फोन लावला, जेणेकरून हे कळावं की त्यात किती पैसे होत. त्यानंतर ओजीला प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून काही नोटा आणि प्लास्टिक बॅग काढली. यासाठी ओजीच्या मालकाला १३० पाउंड खर्च करावे लागले. एकूण २९० पाउंड्सचं नुकसान झालं.
किती रूपये परत मिळाले?
नीलने सांगितले की, ओजी फार लहान असतानापासून त्यांच्याकडे आहे. पण त्याने कधी पैसे खाल्ले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, नीलने सांगितले की, त्या १६० पाउंड्सपैकी साधारण ८० पाउंड्स(७,२७३ रूपये) बॅंकेतून बदलून घेतले.