निअर डेथ एक्सपिरिअन्सच्या केसेस नेहमीच जगभरात बघायला मिळतात. यात लोक हैराण करणाऱ्या गोष्टी बघितल्याचा दावा करतात. अशा अनेक घटना समोर आल्या ज्यात लोक अचानक शवपेटीतून उठतात आणि काही वेळांसाठीच मृत राहतात. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. इथे एका महिलेच्या हृदयाची धडधड 27 मिनिटांसाठी थांबली होती. डॉक्टरही म्हणाले होते की, महिलेचं शरीर निळं पडलं आहे आणि यादरम्यान तिच्या शरीरात जीवनाचे काही संकेत दिसले नाहीत. पण काही वेळातच महिला अचानक उठली. तिने एका कागदावर काहीतरी लिहिलं.
एका रिपोर्टनुसार, ही घटना एरिझोनामधील आहे. महिलेचं नाव टीना हाइन्स आहे. तिला 2018 मध्ये आरोग्यासंबंधी समस्या झाली होती. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. चेक केल्यावर तिला लगेच मृत घोषित करण्यात आलं. पण ती इनक्यूबेटरने उपचार केल्यावर काही वेळातच जिवंत झाली. महिला पुन्हा पुन्हा काहीतरी लिहिण्यासाठी मागत होती. तिला एक पेन आणि कागद देण्यात आला. हे कुणालाच समजलं नाही की, महिलेने कागदावर काय लिहिलं. महिलेने शब्दांवर शब्द लिहिले होते जे कुणालाही समजले नाहीत. ते कुणीही वाचू शकत नव्हते. असं मानलं जात आहे की, महिलेने कागदावर 'रिअल' म्हणजे वास्तविक असा शब्द लिहिला.
टीनाला नंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. तिच्या परिवाराने मीडियाला सांगितलं की, टीनासोबत बोलताना त्यांनी अंदाज लावला की, हा मेसेज स्वर्गातून आला होता. कथितपणे चार मुलांच्या या आईने सांगितलं होतं की, तिला येशूच्या प्रतिमेची कल्पना केली होती, तिला येशू समोर दिसले. आता टीना एक सामान्य जीवन जगत आहे.