इराणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका १० वर्षीय मुलाने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक सुई टाकली. जेव्हा त्रास वाढला तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एक्स-रे काढल्यावर डॉक्टरांनी मुलाच्या शरीरात ९ सेंटीमीटर लांब सुई अडकली असल्याचा खुलासा केला. जगातल्या अनेक देशांमध्ये अशा अजब घटना समोर येतात.
काही दिवसांपूर्वी एका १५ वर्षीय मुलाने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये यूएसबी केबल टाकला होता. त्यानंतर नेपाळमधील एक व्यक्तीने त्याचा प्रायव्हेट पार्ट पाण्याच्या बॉटलमध्ये अडकवला होता. ज्यानंतर मोठ्या प्रयत्नाने त्याचा जीव वाचवण्यात आला होता.
तीन तास चाललं ऑपरेशन
डेली मेलमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, शरीराच्या नाजूक अवयवात सुई अशी फसली होती की, ती सिंगल कट मारून काढली जाऊ शकत नव्हती. मुलाचं वयही लहान असल्याने खूप काळजीपूर्वक सर्जरी करण्यात आली. तीन तास चाललेल्या ऑपरेशननंतर डॉक्टरांना मुलाच्या प्रायव्हेट पार्टमद्ये अडकलेली सुई काढण्यात यश मिळालं.
सुई आत गेली कशी?
सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, मुलाने सुई प्रायव्हेट पार्टच्या आत ढकलली होती. सुई अशा ठिकाणी अडकली होती जिथे खासकरून यूरीन आणि सीमेनचा मार्ग असतो. सद्या हे समजू शकलं नाही की, सुई शरीरात गेली होती. डॉक्टरांनी हेही सांगितलं की, मुलाचं मानसिक आरोग्य पूर्णपणे ठीक आहे.
यूरोलॉजी केस रिपोर्ट्सच्या जर्नलमध्ये प्रकाशित ही घटना फारच दुर्मीळ आहे. मुलावर उपचार करणारे शाहिद सदौघी यूनिव्हर्सिटीचे प्रमुख यूरोलॉजिस्ट सेराजॉडिन वहिदी म्हणाले की, 'प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेल्या टोकदार ऑब्जेक्टला अशाप्रकारे बाहेर काढण्यात पहिल्यांदाच यश मिळालं. सुई आत अशा स्थितीत अडकली होती की काढणं अशक्य होतं. आम्ही इफेक्टेड एरियात एनस्थेटिक इंजेक्शन दिलं. सर्जरीदरम्यान टीमने सुईचं जाड टोक दाबून सुईचं बारीक टोक स्कीनमध्ये घुसवलं आणि अखेर अशाप्रकारे सुई प्रायव्हेट पार्टमधून काढण्यात यश मिळालं.