कुठल्याही व्यक्तीसाठी पिता होणे हा एक सुखद अनुभव असतो. नेदरलँडच्या एका 43 वर्षीय तरुणाने हा अनुभव जवळपास 1000 वेळा घेतला आहे. हा तरुण साधारणपणे 1000 मुलाचा पिता बनला आहे. मात्र आता त्याने आणखी एका मुलाला जरी जन्म दिला, तरी त्याला 91 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. जोनाथन मेजर असे या तरुणाचे नाव आहे.
द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, जोनाथन मेजर (Jonathan Meijer) वर नेटफ्लिक्सने एक डॉक्यूमेंट्रीही बनवली होती. जॉनथन हा 1-2 नाही, तर 1000 मुलांचा पिता आहे. खरे तर हा आकडा त्यालाही व्यवस्थित माहीत नाही. पण त्याचा अंदाज आहे की वेगवेगळ्या देशात त्याचे जवळपास 1000 मुले आहे.
1000 मुलांचा पिता -नेदरलँडमधील 43 वर्षीय जोनाथन डेली मेलसोबत बोलताना म्हणाला होता की, आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची आपली इच्छा होती. यामुळे आपण अशा प्रकारे समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. जोनाथन हा स्पर्म डोनर होता. तो आता निवृत्त झाला आहे. त्यांने वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या शेकडो जोडप्यांना स्पर्म डोनेट केले आहे. यामुळे त्यांना आई-वडील होता आले.
मात्र, आता मुलांची संख्या एवढी वाढली आहे की, भविष्यात आपली मुलं नकळत आपल्याच सावत्र भाऊ-बहिणीशी तर नात्यात येणार नाही ना? अशी भीती पालकांना वाटू लागली आहे.
26 व्या वर्षीच सुरू केले होते स्पर्म डोनेशन -जोनाथन एक पार्टटाइम संगीतकार आणि यूट्यूबर आहे. त्याने सांगितले की तो त्याच्या अनेक मुलांना भेटला आहे. ते सर्व आनंदी आहेत. त्यांच्यापैकी अनेक जण त्यांच्या सावत्र भावंडांनाही भेटले आहेत आणि त्यांच्यासोबत सुट्टीवरही गेले आहेत. या मुलांना आपल्या बद्दलही माहित आहे. जोनाथन 26 व्या वर्षापासूनच स्पर्म डोनेट करत होता.
त्याच्या मते त्याचे जवळपास 550 मुलं आहेत. मात्र, लोकांच्या मते ही संख्या 1000 पर्यंत आहे. द सनच्या वृत्तानुसार, आता जोनाथनने आणखी एक मुलाला जन्म दिला, तर त्याला 91 लाख रुपयांपेक्षाही अधिकचा दंड भरावा लागणार आहे.