शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नोकिया 3310 मध्ये नवीन फिचर्स, किंमतही खिशाला परवडणारी

By admin | Published: February 25, 2017 4:56 PM

नवीन फिचर्ससहीत'नोकिया 3310' हा मोबाइल पुन्हा मार्केटमध्ये येणार आहे. शिवाय, हा फोन सर्वसामान्यांच्या खिशालादेखील परवडणारा आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - नोकिया कंपनी आपला 'नोकिया 3310' हा मोबाइल पुन्हा मार्केटमध्ये आणणार असल्याची बातमी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाली होती. मात्र या फोनमध्ये ग्राहकांसाठी नवीन फिसर्च असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. शिवाय, हा फोन सर्वसामान्यांच्या खिशालादेखील परवडणारा आहे.    
 
बाजारात येणा-या नोकिया 3310 मोबाइलची किंमत 4,152 रुपये इतकी असणार आहे.  शिवाय मोबाईलमध्ये मोनोक्रोम 84X84 डिस्प्ले ब्लॅक अँड व्हाईटऐवजी कलर स्क्रीन  असणार आहे.  मात्र फोनची बॅटरी आधीप्रमाणचे दीर्घकाळ टिकून राहावी, यासाठी डिस्प्ले अधिक शार्प नसेल. 
 
दरम्यान, नोकिया 3310 हा स्मार्टफोन नसला तरी फीचर फोन असेल, अशी माहिती समोर आली आहे. शिवाय हा फोन विविध रंगांमध्येही उपलब्ध होणार आहे. आधीच्या तुलनेत बाजारात येणार हा फोन आकाराने पातळ आणि वजनाने हलका असेल. 
 
17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये हा मोबाइल पहिल्यांदा भारतात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या मोबाइलला  ग्राहकांनी पसंती दर्शविली होती. तसेच, मोठ्या प्रमाणात खरेदीसुद्धा केली होती. या महिन्यात 26 फेब्रुवारीला बार्सिलोना येथे होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये नोकिया कंपनी 'नोकिया 3310' हा मोबाइल पुन्हा लाँच करण्याची शक्यता आहे.  
 
दरम्यान, नोकिया एकेकाळी मोबाइल प्रॉडक्ट्मधली सर्वात विश्वसनीय कंपनी मानली जायची. मात्र नंतर अनेक मोबाईल कंपन्यांचे स्मार्टफोन्स आले. त्यामुळे नोकियाचे लहान फोन मागे पडले. त्यानंतर नोकियाचे अँड्रॉईड फोनसुद्धा मार्केटमध्ये आले. मात्र, स्मार्टफोन्स वापरणाऱ्या लोकांना पर्याय म्हणून 'नोकिया 3310' हा फोन मार्केटमध्ये आणणार असल्याचे समजते.