जगभरात घटस्फोटातून मिळालेल्या पैशांमुळे महिला अब्जाधीश होण्याचा सिलसिला सुरूच आहे. आशियातील सर्वात महागड्या घटस्फोटानंतर आणखी एक महिला अब्जाधीश झाली आहे. वॅक्सीन तयार करणारी शेंझेन कंगटाई बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स कंपनीचे चेअरमन ड्यू वेइमिन यांनी पत्नीला घटस्फोट दिला.
घटस्फोटानंतर पोटगी म्हणून त्यांनी पत्नी युआन लिपिंगला कंपनीचे 16.13 कोटी शेअर दिले आहेत. हे शेअर ट्रान्सफरनंतर लिपिंग जगातल्या सर्वात श्रीमंत महिलांच्या रांगेत सामिल झाल्या आहेत.
ब्लूमबर्गच्या एका एका रिपोर्टनुसार, सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यावर या शेअर्स किंमत 3.2 अब्ज डॉलर म्हणजे 24 हजार कोटी रूपये इतकी होती. ड्यू यांची एकूण संपत्ती आता घटून जवळपास 3.1 अब्ज डॉलर म्हणजे 23 हजार 250 कोटी इतकी राहिली आहे. यात गहाण ठेवलेल्या शेअर्सची किंमत सामिल नाही.
56 वर्षीय ड्यू यांचा जन्म चीनच्या जियांग्शी प्रांतात एका शेतकरी कुटूंबात झाला होता. कॉलेजमध्ये रसायन शास्त्राचा अभ्यास केल्यावर त्यांनी 1987 मध्ये एका क्लिनिकमध्ये काम करण्यास सुरूवात केली आणि 1995 मध्ये एका बायोटेक कंपनीचे सेल्स मॅनेजर बनले. 2009 मध्ये कंगटाईने मिनहाईचं अधीग्रहण केलं. ते कंपनीचे चेअरमन बनले. मिनहाईची स्थापना ड्यू यांनी 2004 मध्ये केली होती.
याआधी जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांचा घटस्फोट सर्वात महागडा ठरला होता. यातून त्यांची पत्नी मॅकेंजीला 2.62 लाख कोटी रूपये मिळाले होते. ज्यानंतर त्यांचा समावेश फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आल्या होत्या.