शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
2
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
3
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
4
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
5
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
6
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
8
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
9
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
10
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
11
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
12
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
13
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
14
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."
15
"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान
16
IND vs AUS : 'त्या' प्रश्नावर KL राहुल म्हणाला; मला सांगितलंय की, कुणाला काही सांगू नकोस!
17
मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ
18
मॉर्निंग वॉकसाठी नेमकी कोणती वेळ आहे सर्वोत्तम?; 'या' गोष्टींचा विचार केल्यास जास्त फायदा
19
राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा
20
राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 2:40 PM

New Human Species China : या प्रजातीच्या आताच्या मानवाशी काही संबंध आहे का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

New Human Species China : मानवाची उत्क्रांती होण्यासाठी लाखो वर्षे लागली. माकडापासून सुरू झालेली मानव जात आज अतिशय प्रगत टप्प्यात आहे. दरम्यान, आजही जगभरातील अनेक ठिकाणी अश्मयुगीन मानवाचे अवशेष सापडतात. या अवशेषातून आपल्याला त्या काळातील मानवाची शरीरचना आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते. विशेष म्हणजे, आता चीनमध्ये मानवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती चीनमध्ये 3 लाख ते 50 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचा अंदाज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या प्रजातीमधील मानवाचं डोकं खूप मोठं होतं. आपले पूर्वज होमो सेपियन्स असल्याचं मानलं जातं, पण चीनमध्ये सापडलेले अवशेष यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे ही नवीन प्रजाती कुठून आली, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. 

या मानवाचा आपल्याशी काही संबंध आहे का?चीनमध्ये मोठं डोकं असलेल्या मानवांची एक नवीन प्रजाती सापडली आहे. या प्रजातीचं नाव Homo Juluensis, म्हणजेच मोठं डोकं आहे. ही प्रजाती चीनमध्ये 3 लाख ते 50 हजार वर्षांपासून अस्तित्वात होती. आपण होमो सेपियन्सपासून उत्क्रांत झालो आहोत, जे सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी विकसित झाले. आफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये वेगाने पसरले. पण चीनमध्ये आढळलेली प्रजाती नेमकी कुठून आली? याचे उत्तर शास्रज्ञ शोधत आहेत. 

हे होमिनिन्स (Homonins) आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वीचे आहेत का? असा प्रश्नही उपस्थित होतोय. यांचे अस्तित्व 7 ते 3 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर असण्याचा अंदाज आहे. सूमारे चार लाख वर्षे त्यांचे पृथ्वीवर अस्थित्व असू शकते. विशेष म्हणजे, मानवाची नवीन प्रजाती सापडल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जगाच्या कानाकोपऱ्यात मानवाच्या विविध प्रजाती अस्तित्वात होत्या. युरोपमधील होमो हाइडेलबर्गेन्सिस आणि मध्य चीनमधील होमो लाँगी प्रमाणे, हीदेखील प्रगत मानवाची प्रजाती असण्याची शक्यता आहे. आता त्यांचा सकोल अभ्यास करुनच शास्त्रज्ञ एखाद्या निष्कर्षावर येतील. 

होमो सेपियन्सशी संबंधचीनमध्ये सापडलेल्या प्रजातीला शास्त्रज्ञांनी पुरातन होमो सेपियन्स किंवा मध्य प्लेस्टोसीन होमो देखील म्हटले आहे. म्हणजे एकंदरीत ही प्रजाती मध्यम काळातील असण्याचा अंदाज आहे. हवाई विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ क्रिस्टोफर बे आणि चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टेब्रेटचे जीवाश्मशास्त्रज्ञ झिउजी वू यांनी मानवाच्या या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. नुकताच त्यांचा अभ्यास या वर्षीच्या पॅलिओअँथ्रोपोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स