१४ व्या वर्षी तुम्ही काय करत होते? एकतर अभ्यास आणि दुसरं खेळणे! पण आताच्या पिढीत छोटी छोटी मुलं मोठी मोठी काम करत आहेत. असाच एक न्यूयॉर्कच्या लॉन्ग आयलॅंडचा मुलगा आहे. हा मुलगा ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळून कोट्यवधी रूपये कमावतो आहे. या मुलाचं नावं आहे Griffin Spikoski आणि त्यांचं वय आहे १४ वर्ष. त्याने ऑनलाइन गेम खेळून चक्क १.३८ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
गेम खेळण्याचा देतो इतका वेळ
ग्रिफीन दिवसभरातील ८ ते १८ तास ऑनलाइन गेम खेळतो. Fortunite नावाच गेम खेळून तो त्याचे व्हिडीओ तयार करतो आणि हे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करतो. मग काय त्यानंतर जाहिरातदार, स्पॉन्सर आणि सब्सक्रायबरच्या माध्यमातून तो रग्गड कमाई करतो.
कशी सुचली आयडिया
ग्रिनीन पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आला जेव्हा काही महिन्यांपूर्वी त्याने एका प्रसिद्ध Fortnite गेमरला हरवल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला त्याला साधारण ७.५ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यानंतर त्याची कमाई सुरू झाली.
पैसे खर्च नाही करत
१४ वर्षीय ग्रिफीन भलेही वयाने लहान असेल पण त्याचे विचार मोठ्यांसारखे आहेत. ते गेमिंगद्वारे मिळणारे पैसे जमा करतो. जेणेकरून त्याचं गेमिंगचं करिअर संपलं तर पुढे जाऊन कॉलेजला जाता यावं. एक नवीन घर घेता यावं.