Marriage Rituals : लग्न म्हटलं की, वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. काही रिवाज लग्नाआधी तर काही लग्नानंतर केले जातात. कुठे लग्नानंतर नवरी कपडे घालत नाही तर कुठे पूर्ण परिवार नवरदेवाचे कपडे फाडतात. तर कुठे नवरदेवाचं स्वागत फुलांच्या हाराने नाही तर टोमॅटोने केलं जातं. आज लग्नाच्या अशात एका रिवाजाबाबत जाणून घेणार आहोत.
आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही. यादरम्यान पती-पत्नी ऐकमेकांशी बोलूही शकत नाही. इतकंच नाही तर त्यांना एक आठवडा दूर ठेवलं जातं. हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटातील पिणी गावात आजही ही प्रथा पाळली जाते. तसेच नवरदेवाला सुद्धा काही नियमांचं पालन करावं लागतं.
नवरदेवासाठी काय असतात नियम?
हिमाचलच्या पिणी गावात लग्नानंतर केवळ नवरी विना कपड्यांची राहते. पण यादरम्यान नवरी केवळ उलनचे पट्टे घालू शकते. या दिवसात पुरूषांनाही काही नियमांचं पालन करावं लागतं. पुरूष या दिवसात मद्यसेवन करत नाहीत. असं मानलं जातं की, जर नवरी-नवरदेवाने या नियमांचं पालन केलं तर त्यांना सौभाग्य मिळतं.
नवरीची आई करते अजब प्रथा
छत्तीसगढमध्ये लग्नासंबंधी एक अजब प्रथा पाळली जाते. छत्तीसगढच्या कवर्धा जिल्ह्यात बॅगा आदिवासी समाजात लग्नादरम्यान नवरीची आई नवरदेवाला दारू पाजून रिवाजाची सुरूवात करते. त्यानंतर पूर्ण परिवार सोबत बसून दारू पितात. इथे नवरीही नवरदेवाला दारू देते. त्यानंतर लग्नाचा आनंद साजरा केला जातो. यांच्यात आणखी एक चांगली बाब म्हणजे या समाजात हुंडा अजिबात घेतला जात नाही.
सोबत राहिल्यावर एक वर्षाने मिळते लग्नाची परवानगी
काही आदिवासी समाजांमध्ये नवविवाहित जोडप्याला कुणासोबतच बोलण्यास मनाई असते. या समाजात नव्या जोडप्याला एका गुप्त ठिकाणी पाठवलं जातं. यादरम्यान ते एकमेकाशिवाय दुसऱ्या कुणाच सोबत बोलू शकत नाहीत. एक वर्ष सोबत राहिल्यानंतर वयोवृद्ध लोक त्यांचं लग्न वैध ठरवतात. त्यानंतरच लग्नाचा आनंद साजरा केला जातो.
फाडतात नवरदेवाचे कपडे
सिंधी समाजात सांठ किंवा वनवासाचा रिवाज करताना नवरी आणि नवरदेवाच्या पायात एक घुंगरू बांधलं जातं. त्यानंतर काही महिला नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर तेल टाकतात. यानंतर दोघांनाही नवीन शूज देऊन पायाने एक मातीचा दिवा तोडावा लागतो. यानंतर सगळे मिळून नवरदेवाचे कपडे फाडतात. असं मानलं जातं की, असं करून वाईट शक्ती निघून जातात आणि लग्नात सगळं काही ठीक होतं.