शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

बाबो! एका व्यक्तीने ३ कोटी रूपयांना खरेदी केले हे जुने शूज, पण इतकी किंमत का रे भौ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 2:22 PM

काही लोक हे त्यांच्या आवडीच्या गोष्टीसाठी किती पैसे लागतील याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना त्यांची आवडीची वस्तू मिळवणे हेच माहीत असतं, मग किंमत कितीही असो.

काही लोक हे त्यांच्या आवडीच्या गोष्टीसाठी किती पैसे लागतील याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना त्यांची आवडीची वस्तू मिळवणे हेच माहीत असतं, मग किंमत कितीही असो. अशाच एका व्यक्तीला नाइकीचे शूज पसंत आले. पणे हे सामान्य शूज नव्हते. हे शूज १९७२ मध्ये तयार करण्यात आलेले होते. या शूजसाठी या व्यक्तीने तब्बल ३ कोटी रूपये दिले. नाही म्हणजे शौक मोठी गोष्ट असते हे माहीत आहे, पण हे जरा जास्तच आश्चर्याचं आहे ना?

या शूजच्या पेअरचं नाव Nike Moon Shoes असं आहे. या शूजचा लिलाव नुकताच न्यूयॉर्कमध्ये करण्यात आला. याची किंमत ४३७, ५०० डॉलर इतकी ठेवण्यात आली होती.  भारतीय करन्सीनुसार ही किंमत ३,०१,८८,३७५.०० इतकी होते. 

कुणी घेतले?

कॅनडात राहणाऱ्या Miles Nadal नावाच्या बिझनेसमन व्यक्तीने हे शूज खरेदी केले.  इतकेच काय तर या व्यक्तीचं एक वैयक्तिक संग्रहालय सुद्धा आहे. ते हे शूज त्यातच ठेवणार आहेत. त्यांच्याकडे १४२ अ‍ॅंटिक कारही आहेत. तर ४० जुन्या बाइक्सही आहेत. माइल्स यांचं जुन्या वस्तुंवर फार प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी या शूजसाठीही ३ कोटी रूपये दिले.

Moon Shoe नाइकी ब्रॅन्डच्या इतिहासातील एक महत्त्वाचं प्रॉडक्ट होतं. नाइकीचे को-फाउंडर बिल बोवरमॅनने हे शूज डिझाइन केले होते. हे शूज १९७२ मध्ये ऑलम्पिक दरम्यान रनर्ससाठी तयार करण्यात आले होते.

या मॉडलचे केवळ १२ शूज तयार करण्यात आले होते. माइल्स म्हणाले की, 'मला फार आनंद झाला की, शूजच्या विश्वात एक दुर्मिळ शूजची निर्मिती नाइकीने केली होती. यातून खेळांचा इतिहास, कला आणि पॉप कल्चरचं दर्शन होतं. याआधी मी शूजचे ९९ पेअर खरेदी केले होते, तेव्हा मला वाटलं होतं की, नाइकीकडे असंच एक वेगळं कलेक्शन शिल्लक आहे. तेच झालं'.

२०१७ मध्ये प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनने साइन केलेला एक शूज विकला गेला होता. हा शूज Converese चा होता. त्यावेळी याची किंमत १९०, ३७३ डॉलर होती. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १, ३१,३७,९२६.२९ रूपये होते. या शूजचा सर्वात जास्त किंमत मिळण्याचा रेकॉर्ड नाइकीच्या शूजने तोडला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल