शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

नऊशे जावयांना धोंडे जेवण

By admin | Published: July 07, 2015 3:36 AM

ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला नऊशे जावई-पाहुण्यांनी आपल्या सौभाग्यवतींसह हजेरी लावली...

न्हावरे : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे अधिक मासानिमित्त माजी आमदार अशोक पवार वपंचायत समिती सदस्या सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला नऊशे जावई-पाहुण्यांनी आपल्या सौभाग्यवतींसह हजेरी लावली. वडगाव रासाई येथील रासाईदेवी मंदिराच्या समोरील भव्य पटांगणात हा कार्यक्रम धार्मिक व मंगलमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच मंगलवाद्याच्या निनादात रांगोळ्या सजवून पायघड्या टाकून मोठ्या आदराने जावई-पाहुणे व लेकींचे स्वागत ग्रामस्थ करत होते. माजी आमदार अशोक पवार व पंचायत समिती सदस्या सुजाता पवारजावई पाहुण्यांचे व या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेराच्या ओढीने आलेल्या गावातील लेकींचे स्वागत करताना आपुलकीने आणि जिव्हाळ्याने विचारपूस करत होते. जीवाभावाचे व ऋणानुबंधाचे घट्ट नाते निर्माण करणाऱ्या या प्रसंगी काहीसे भावूक वातावरण निर्माण झाले होते. गावातील ग्रामस्थांमध्ये एकमेकांविषयीचे प्रेम व आपुलकी वाढीस लागते. त्यामुळे माजी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, अशाच स्वरूपाचे गावोगावी सामुदायिक धोंडे जेवणाचे कार्यक्रम झाले तर ग्रामस्थांमध्ये परस्परांबद्दल प्रेम व आपुलकीची भावना वाढीस लागेल.(वार्ताहर)