Weird Traditions Around The World : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रिती-रिवाज, परंपरा फार आधीपासून फॉलो केल्या जातात. अशाच परंपरेत एका द्वीपाची परंपरा आहे. जिथे केवळ आणि केवळ पुरूषच जाऊ शकतात. या बेटावर जाण्यास महिलांना बंदी आहे. महत्वाची बाब म्हणजे पुरूष इथे समुद्राच्या देवी रूपाची पूजा करतात. पण महिलांना इथे जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.
ही मंदिराची किंवा देवस्थानाची बाब नाही. जगात असंही एक बेट आहे जिथे केवळ पुरूषच जाऊ शकतात आणि महिलांना इथे येण्यास मनाई आहे. चला आम्ही तुम्हाला आज यामागचं कारण सांगणार आहोत. हे बेट जपानमध्ये याचं नाव ओकिनोशिमा आहे. महिलांना बंदी असण्यासोबतच इथे अनेक कठोर नियमांचं पालन करावं लागतं.
जपानच्या ओकिनोशिमा आयलॅंडला यूनेस्कोने हेरिटेज घोषित केलं आहे. हे बेट एकूण 700 वर्ग मीटरमध्ये पसरलं आहे. असं सांगण्यात आलं की, चौथ्या किंवा नवव्या शतकात हे बेट कोरियन आयलॅंड आणि चीनच्या व्यापाराचं केंद्र होतं. याला धार्मिक रूपाने फार पवित्र मानलं जातं. या बेटावर प्राचीन काळापासून चालू असलेल्या परंपरा आजही तशाच आहेत. यामुळेच इथे महिलांच्या येण्यावर बंदी आहे. इथे येणाऱ्या पुरूषांबाबतही काही कठोर नियम आहेत.
असं सांगितलं जातं की, या बेटावर जाण्याआधी पुरूषांन निर्वस्त्र होऊन आंघोळ करणं गरजेचं असतं. इथे इतके कठोर नियम आहेत की, पूर्ण वर्षात केवळ 200 पुरूषच इथे येऊ शकतात आणि इथे येताना त्यांना सोबत काहीच नेता येत नाही. त्यांचं इथे येणंही गुप्त असतं. असाही शिंबूनच्या रिपोर्टनुसार, इथे मुनाकाता तायशा ओकित्सु मंदिर आहे. जिथे समुद्राच्या देवीची आराधना केली जाते. असं म्हणतात की, 17व्या शतका दरम्यान समुद्री यात्रे दरम्यान जहाजांच्या सुरक्षेसाठी पूजा केली जात होती.