Man Found Panna Diamond : कधी कुणाचं नशीब कसं चमकेल काही सांगता येत नाही. नशीब कुणाला श्रीमंतापासून गरिब बनवतं तर एखाद्याला श्रीमंत बनवतं. नशीबाचा असाच खेळ नोएडातील एक उद्योगपतीसोबत बघायला मिळाला. या उद्योगपतीच्या हाती असं काही लागलं ज्याने तो रातोरात लखपती झाला.
खाणींमध्ये शेकडो रत्न दडलेले असतात. यातील काही रत्न असे असतात ज्यांच्या किंमतीने व्यक्तीचं नशीब बदलतं. नोएडाच्या (Noida) प्रताप सिंह नावाच्या उद्योगपतीला पन्नाच्या खाणीत एक अशाच मूल्यवान हिरा (Panna Diamond) सापडला. हा हिरा ४.५७ कॅरेटचा आहे. आणि याची किंमत २५ लाख रूपये सांगितली जात आहे. आता या हिऱ्याचा लिलाव २४ फेब्रुवारीला केला जाणार आहे.
मध्य प्रदेशचा पन्ना जिल्हा जगभरात मूल्यवान हिऱ्यांसाठी ओळखला जातो. याच पन्नाने आता उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये राहणाऱ्या राणा प्रताप सिंहचं नशीब चमकवलं. या उद्योगपतीच्या हाती खोदकाम करताना ४.५७ कॅरेटचा मौल्यवान हिरा लागला.
राणा प्रताप सिंह बिल्डींग मटेरिअलचा व्यवसाय करतो. त्यांनी मीडियाला सांगितलं की, मनोज कुमार दास आणि गौतम मित्री नावाचे दोन तरूण त्याच्या दुकानात काम करत होते. त्यांनी त्याला पन्नाच्या जगप्रसिद्ध हिऱ्याबाबत सांगितलं होतं. आधी तर प्रताप यांनी मुलांच्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितल्यावर प्रताप सिंह पन्नाला गेले आणि तिथे खाण घेतली.
दोन्ही मुलांच्या सांगण्यावरून प्रतास सिंहने आपला सगळा व्यवसाय एका व्यक्तीच्या हवाली केला आणि तो पन्ना येथे गेला. इथे त्यांनी ९ सप्टेंबर २०२१ ला हिरा कार्यालयाकडून भरका या ठिकाणी थोडी जागा घेतली. यानंतर खाणीत खोदकाम सुरू केलं. आता साधारण ४ महिन्यांनंतर प्रताप यांना हा किंमती हिरा सापडला.
नियमानुसार राणा प्रताप सिंह यांनी हा हिरा हिरे कार्यालयात जमा केला. आता येथील या हिऱ्याचा २४ फेब्रुवारीला लिलाव केला जाईल. या हिऱ्याच्या लिलावानंतर राणा प्रताप सिंह यांना रक्क दिली जाईल. ज्यातून १२ टक्के रॉयल्टी आणि २ टक्के डीडीएस कापला जाईल.