- तुषार भामरे
मुंबई, दि. 23 - ॲपलच्या मॅकबूक एअर पेक्षाही स्लिम असणारा लॅपटॉप अस्तित्वात आहे. अनेकांना आश्चर्य वाटेल पण एचपी या कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा लॅपटॉप बाजारात आणलाय. सर्वात पातळ लॅपटॉप निर्माती कंपनी म्हणून जगभरात ओळख प्रस्थापित करणाऱ्या ॲपलवर मात्र स्वत:च्याच वैशिष्ट्याच्या बाबतीत यामुळे मागे राहिण्याची वेळ आली आहे. मॅकबूक एअर हा १.७० सेंटिमीटर इतका पातळ आहे तर एचपीने लॉंच केलेला ‘एचपी स्पेक्टर’ हा १.०४ सेंटिमीटर इतका पातळ आहे. वजनाच्या बाबतीतही एचपी स्पेक्टर आघाडीवर आहे. स्पेक्टरचे वजन १ किलो १ ग्रॅम असून मॅकबूक एअरचे वजन १ किलो ३५ ग्रॅम आहे. एवढंच नाही तर सौंदर्य, वजन आणि पातळपणा या बाबतीत पुढे असल्याचा मॅकबूक एअरचा दावा एचपी स्पेक्टरने खोडून काढला आहे. पाहता क्षणी भूरळ घालेल असा हा लॅपटॉप आहे.
एचपी स्पेक्टरचे स्पेसिफिकेशन्स:
- CPU: 2.5GHz Intel Core i7-6500U (dual-core, 4MB cache, up to 3.1GHz with Turbo Boost)
- Graphics: Intel HD Graphics 520.
- RAM: 8GB LPDDR3 SDRAM (1,866MHz)
- Screen: 13.3-inch, 1,920 x 1,080 FHD IPS UWVA BrightView Corning Gorilla Glass WLED-backlit display
- किंमत : १,५२,४४०/- (ॲमेझॉन इंडियावर)