शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आता तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र!

By admin | Published: May 06, 2015 10:17 PM

शेंगेतून काढलेले तयार तुरीचे हिरवे दाणे मिळाले तर या उद्योगाला चांगली चालना मिळेल, या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे.

राजरत्न सिरसाट, अकोेलातुरीच्या डाळीपेक्षा हिरव्या दाण्यांमध्ये अधिक जीवनसत्त्व असल्याने, अलीकडे या हिरव्या शेंगांना बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात हिरव्या शेंगा विक्रीस येण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांना जर शेंगेतून काढलेले तयार तुरीचे हिरवे दाणे मिळाले तर या उद्योगाला चांगली चालना मिळेल, या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे. हे या देशातील पहिलेच यंत्र असल्याचा दावा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.भारतात तूर या डाळवर्गीय पिकाचे सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे. मागील वर्षी पावसाला विलंब झाल्याने देशात ८३.२४ लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. हे पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. तुरीच्या डाळीत जीवनसत्त्वाची मात्रा इतर डाळींपेक्षा अधिक असल्याने देशात तूर डाळ उत्पादनावर अधिक भर दिला जात आहे, पण अलीकडे ग्राहकांचा ओढा हा तुरीच्या डाळीऐवजी हिरव्या शेंगांकडे वाढला आहे. म्हणूनच तुरीच्या या हिरव्या शेंगेचे दर बाजारात प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तुरीच्या हिरव्या दाण्यांमध्ये वाळेलल्या डाळीपेक्षा जीवनसत्त्व (प्रोटिन्स) अधिक प्रमाणात असल्याने ग्राहक हिरव्या शेंगेची मागणी करीत आहेत. या हिरव्या दाण्यांमध्ये प्रोटिन्स तर अधिक आहेतच, शिवाय या दाण्यांची भाजी रुचकर आणि स्वादिष्ट बनते. विशेष म्हणजे, या हिरव्या तुरीची भाजी खाल्ल्याने आम्लपित्ताचा त्रास जाणवत नाही. त्यामुळेही हिरव्या शेंगेला मागणी वाढतीच आहे. त्याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीचे कोवळे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राची ताशी २५ किलो हिरव्या शेंगांतून दाणे काढण्याची क्षमता आहे. या यंत्राच्या चाळणीत थोडा बदल केल्यास यातून वाटाण्याच्या शेंगादेखील सोलल्या जातात. एक ते दोन वर्षाच्या संशोधनाअंती कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्चात संशोधन, तंत्रज्ञान विभागाने हे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला राज्यस्तरीय संशोधन व आढावा समितीसमोर मांडण्यात येणार आहे.-------आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्याप तुरीच्या हिरव्या शेंगांतून दाणे काढणारे यंत्र विकसित झाले नाही. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची गरज बघून या यंत्राचा विकास केला आहे. - डॉ. प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता तथा विभागप्रमुख, कापणीपश्चात संशोधन, तंत्रज्ञान विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.