(Image Credit : The Hans India)
सामान्यपणे तुरूंगांमध्ये कैद्यांना कोणतीही खास प्रकारची सुविधा दिली जात नाही. भारतातील तुरूंगांची अवस्था तर आपण नेहमीच सिनेमांमधून बघत असतो. पण एका तुरूंगात कैद्यांना खासप्रकारची सुविधा देण्यात आली आहे. दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील तुरूंगांमध्ये केद्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलंय. या माध्यमातून आता कैदी सुद्धा शॉपिंग करू शकणार आहेत.
कैद्यांसाठी महिन्यातून एकदा तीन हजार रूपयांचं साहित्य खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. शॉपिंग मशीन मध्ये पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून ते लॉग इन करून ऑनलाईन शॉपिंग करू शकतील.
याच वर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत गुआंगडोंग तुरूंगात प्रशासनाने कोंगहुआ तुरूंगात एक पायलट प्रोजेक्ट चालवला होता. तेव्हा कैद्यांनी साधारण १३ हजार ऑर्डर दिले होते. ज्यातून साधारण ४ लाक रूपयांची खरेदी केली गेली होती. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतरच कैद्यांना आता ऑनलाइन शॉपिंगची सुविधा दिली जात आहे.
तुरूंगात एका वार्ड बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोर ऑनलाइन शॉपिंग टर्मिनलांनी सुसज्जित आहे. इथे कैदी दैनंदिन गरजांच्या वस्तू, खाद्य पदार्थ, सिगारेट आणि भेटवस्तूंसहीत २०० प्रकारच्या वस्तूंची खरेदी करू शकतात. याआधी कैदी खरेदीसाठी आपल्या हाताने लिहिलेली एक लिस्ट अधिकाऱ्यांना देत होते. अधिकारी वस्तूंची खरेदी करून कैद्यांना आणून देत होते. यात अनेक दिवस वेळ जात होता.