ट्रकच्या मागे ‘हॉर्न प्लीज’ असे लिहिलेले आपण नेहमीच बघतो. मागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवावा अशी अपेक्षा यामागे असते. परंतु आता असे होणार नाही कारण जग बदलले आहे. हॉर्नबाबत एक नवे तंत्रज्ञान विकसित झाले असून याद्वारे वाहन नाहीतर रस्तेच हॉर्न वाजवतील. हे खरे आहे. महामार्गांवरील सुरक्षा वाढविण्याकरिता ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर याची यशस्वी चाचणीही पार पडली आहे. हा देशातील अत्याधिक धोकादायक महामार्ग समजला जातो. या प्रणालीअंतर्गत रस्त्यांच्या वळणाजवळ स्मार्टलाईफ पोल्स बसविण्यात येतात. हे पोल कुठल्याही तारेशिवाय एकमेकांना जोडण्यात आले आहे. वाहतुकीदरम्यान वाहनाचा वेग लक्षात घेऊन हे पोल्स हॉर्न वाजवून चालकांना सतर्क करतात. ही प्रणाली लावण्यात आल्यावर रस्त्यांवरील अपघात कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
आता गाड्या नव्हे रस्ते वाजविणार हॉर्न!
By admin | Published: May 02, 2017 12:45 AM