इन्कम टॅक सगळेच जमा करतात. मग तो कोणत्याही रूपात असो. घराचा टॅक्स, पाण्याचा टॅक्स आणि आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतात. पण कधी तुम्ही उन्हाचा टॅक्स किंवा सावलीचा टॅक्स दिलाय का? नाही ना? हे भलेही आपल्या देशात होत नसलं तरी काही देश असे आहेत, जिथे उन्हावर आणि सावलीवर लोकांकडून टॅक्स वसूल केला जातो.
अमेरिकेतील ऑर्कन्स राज्यात टॅटू किंवा शरीरावर कोणताही फोटो काढायचा असेल तर ६ टक्के टॅक्स द्यावा लागतो. तसेच इटलीच्या वेनेटो शहरात कॉनेग्लियानो नावाचं ठिकाण आहे. इथे रेस्टॉरंट आणि दुकानांपुढे लागलेल्या बार्डांची किंवा टेंटची सावली गल्लीत पडली तर एका वर्षात १०० डॉलर टॅक्स म्हणून वसूल केले जातात.
(Image Credit : independent.co.uk)
स्पेनच्या बॅलरिक द्वीप समूहात २०१६ पासून सन टॅक्स म्हणजे उन्हावर टॅक्स लावला जातो. कारण इथे दरवर्षी एक कोटींपेक्षा अधिक पर्यटक येतात. त्यामुळे स्थानिक संसाधनांवर दबाव पडतो. तेच अमेरिकेत २०१० पासून टॅनिंग टॅक्स लावला जातो. हा टॅक्स लावण्यामागील मुख्य कारण म्हणजे स्कीन कॅन्सरला रोखलं जावं म्हणून.
ओल्ड स्टफ मॅगझिननुसार, हंगेरीमध्ये २०११ पासून दरदिवशी डबाबंद खाण्यावर पैसे वसूल केले जातात. ज्यात जास्त प्रमाणात साखर आणि मीठ असतं. अधिकृतरिकत्या याला पब्लिक हेल्थ प्रॉक्ट टॅक्स म्हटलं जातं. अलबामा रेव्हेन्यू डिपार्टमेंटनुसार, अमेरिकेच्या अलबामा राज्यात खेळण्याच्या पत्त्याच्या बंडलावर टॅक्स लावला जातो. अशाप्रकारचा टॅक्स वसूल करणारं अलबामा हे एकमेव राज्य आहे.
(Image Credit : newsroom.unsw.edu.au)
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, जपानमध्ये मेटाबो कायद्यानुसार, ४० ते ७५ वयोगटातील लोकांची कंबर दरवर्षी मोजणं गरजेचं आहे. जर पुरूषांच्या कंबरेची लांबी ८५ सेंटीमीटरपेक्षा अधिक असेल तर त्यावर टॅक्स लावला जातो आणि महिलांची कंबर ९० सेंटीमीटरपेक्षा अधिक असेल तर यावरही टॅक्स लावला जातो.