कोणत्याही कपलसाठी आई-बाबा होण्याचा आनंद फार खास असतो. लोक हा आनंद सेलिब्रेट करतात. पण यूकेमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक महिला प्रेग्नेंट झाली. जेव्हा तिच्या प्रेग्नेन्सीची खबर तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्याला लागली. त्याने तिला न विचारता ऑफिसमधील सर्वांना याबाबत सांगितलं. यावरूनच प्रेग्नेंट महिला चांगलीच रागावली आणि ती सर्वांसमोर त्याच्यावर रागावली.
महिलेने दिली होती सहकाऱ्याला लिफ्ट
'मिरर'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, महिलेने सांगितलं की, तिने तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्याला एक दिवस कारमध्ये लिफ्ट दिली होती. यादरम्यान त्याने महिलेचा प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट पाहिला. दुसऱ्या दिवशी ऑफिस जाऊन त्याने सर्वांना एका ठिकाणी जमा केलं आणि सर्वांना सांगितलं की, महिला प्रेग्नेंट आहे.
महिलेने सोशल मीडिया साइट रेडीटवर या घटनेबाबत सांगितलं. महिलेने सांगितलं की, ती प्रेग्नेंट असण्याबाबत केवळ तिच्या पतीला माहीत होतं. तिने सांगितलं की, आम्ही याबाबत अजून आपल्या परिवारातील लोकांना आणि मित्रांनाही सांगितलं नव्हतं. तिने आरोप लावला की, तिच्या सहकाऱ्याने तिची प्रायव्हसी भंग केली.
महिला म्हणाली की, 'मला नाही माहीत की, त्याला याबाबत कसं समजलं. जेव्हा त्याने मोठ्याने घोषणा केली की मी प्रेग्नेंट आहे मी हैराण झाले. मी शॉक्ड झाले आणि त्याच्याकडे बघत राहिले. त्यानंतर ऑफिसमधील सगळे लोक मला शुभेच्छा देत होते. पण या सर्व प्रकारामुळे मला धक्का बसला होता.
नंतर मागितली माफी
जेव्हा मी त्याला विचारलं की, त्याला याबाबत कसं समजलं? तेव्हा त्याने मला आठवण दिली की, जेव्हा मी त्याला लिफ्ट दिली होती. तेव्हा मी डॅशबोर्डवर आपल्या प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट ठेवला होता. यानंतर महिला चांगलीच भडकली. मात्र, नंतर तिचा राग शांत झाला आणि ओव्हर रिअॅक्ट करण्यावरून रेडीटवर माफीही मागितली.