नवी दिल्ली : भ्रष्टाचाराबाबत अलीकडच्या काळात सरकार अत्यंत जागरूक असल्याचं दिसून येते. तपास यंत्रणा लाच घेणाऱ्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. अशा परिस्थितीत लाचखोरीची प्रकरणे रोज उघड होत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? लाचखोरांकडून जप्त केलेल्या नोटांबाबत एक विचित्र नियम आहे. खरे तर सापळा रचून जप्त केलेल्या नोटांवर तपास यंत्रणेपासून ते अधिकारी आणि साक्षीदारांच्या सह्या घ्याव्या लागतात. या नियमामुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या नोटा खराब होतात.
दक्षता पथक प्रत्येक नोटेवर स्वाक्षरी करते
माहितीनुसार, विजिलेंस ब्युरो लाचखोरीच्या प्रकरणात भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करते. त्यांना लाच घेताना नोटांसह अटक करण्यात येत असते. या नोटा जप्त केल्यानंतर दक्षता पथक साक्षीदारांच्या उपस्थितीत त्या नोटांवर सह्या करतात. प्राप्त झालेल्या प्रत्येक नोटवर अधिकारी स्वाक्षरी करतात. अनेक वेळा दक्षता पथकाला शंभराच्या नोटांवर सह्या कराव्या लागतात. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत आहेत.
RBI च्या म्हणण्यानुसार नोटेवर लिहिणे योग्य नाही
भलेही हा नियम नसला तरी कोणत्याही नोटेवर लिहिणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया योग्य मानत नाही. नोटेवर काहीही लिहिणे किंवा सही करणे योग्य नाही असे आरबीआयचे(RBI) म्हणणे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका सरकारी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यानंतर दक्षता पथक आणि साक्षीदारांच्या सुमारे १२०० सह्या कराव्या लागल्या. अशी अनेक प्रकरणे दरवर्षी समोर येतात.
पुराव्यासाठी नोटा ठेवल्या जातात
विशेष म्हणजे, नोटा जप्त केल्यानंतर, अधिकारी आणि साक्षीदार त्यावर स्वाक्षरी करतात. त्यानंतर पुरावा म्हणून या नोटा मालखान्यात जमा केल्या जातात. लाचखोरीमुळे या नोटा चलनातू बाहेर जात असल्याचं सूत्रांनी सांगितले. तपास यंत्रणा आरबीआयला कोणत्या प्रकारच्या, कोणत्या क्रमांकाच्या आणि किती नोटा जप्त केल्या आहेत याची माहितीही देते. भारतात दरवर्षी लाखो रुपयांच्या नोटा धाडीत सापडतात. त्या चलनातून बाद होतात.