Luteri Dulhan: जयपूरच्या बजाज नगर भागात एका 73 वर्षीय वृद्धानला एका वर्षाआधी पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करणं चांगलंच महागात पडलं. 62 वर्षीय पत्नी लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीला त्रास देऊ लागली आणि लग्नाच्या तीन महिन्यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. मार्च 2022 मध्ये वृद्ध व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तक्रार दाखल झाली नाही. वृद्ध व्यक्तीने आता कोर्टात केस दाखल केली आहे. वृद्ध व्यक्ती एक रिटायर्ड अधिकारी असून ज्याला दोन मुलं आणि नातवंडे आहेत.
बजाज नगर पोलिसांनी सांगितलं की, 73 वर्षीय रामधनकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत रामधनने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं जून 2021 मध्ये निधन झालं होतं. यानंतर रामधनने सुमन नावाच्या एका विधवा महिलेसोबत डिसेंबर 2021 मध्ये आर्य समाज मंदिरात दुसरं लग्न केलं. लग्नाच्या 5 दिवसांनंतरच सुमनचा व्यवहार बदलला आणि तिने पतीला ब्लॅकमेल करत घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावे करण्याची व फ्लॅट खरेदी करून देण्याची मागणी केली. तसेच 20 हजार रूपये प्रति महिला खर्च देण्याचीही मागणी केली. धमकी दिली की, हे असं केलं नाही तर ती त्याच्या विरोधात खोटी केस दाखल करेल. इतकंच नाही तर ती असंही म्हणाली की, असं केलं नाही तर ती जेवणातून त्याला विष देऊन जीवे मारेल.
पीडित व्यक्तीने सांगितलं की, आरोपी महिला घराच्या पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या वृद्ध व्यक्ती सूनेला-नातवंडांनाही पतीसोबत बोलू देत नव्हती. कथितपणे तिने पतीला शिव्याही दिल्या आणि मारहाणही केली. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मार्च 2022 मध्ये सुमनने पतीसोबत भांडण केलं आणि त्यानंतर घर तिच्या नावावर करण्यास सांगून घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. ती 2 लाख रूपये रोख घेऊन फरार झाली.
यानंतर वृद्ध व्यक्तीने सुमनला फोन केला तर सुमनने उलट त्यालाच धमकावणं सुरू केलं. तिने घराचा अर्धा हिस्सा आणि प्लॅटची मागणी केली. याला वैतागून वृद्ध व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली. त्यानंतर पीडितने कोर्टाकडे न्यायाची मागणी केली. आता त्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. पोलीस सुमनचा शोध घेत आहेत.