शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 10:06 AM

Old Necklace Found In England: वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.

Old Necklace Found In England: जगभरातून नेहमीच अशा घटना ऐकायला मिळतात की, खोदकाम करताना शेकडो किंवा हजारो वर्ष जुन्या वस्तू सापडल्या. इंग्लंडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक 1,300 वर्ष जुना नेकलेस सापडला आहे. सेंट्रल इंग्लंडमध्ये एका बांधकामाचं खोदकाम करताना एंग्लो सॅक्सन स्मशानभूमीतील एका कबरेत सोनं आणि मौल्यवान रत्नापासून तयार 1,300 वर्ष जुना हार सापडला आहे. लंडन पुरातत्व विभागानुसार, हा हार 630-670 ईस्वी सन पूर्वचा आहे.

वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. या हारामध्ये रोमन नाणी, सोनं, गार्नेट, काच आणि काही रत्ने आहेत. एकूण यात 30 पेंडेंट आहेत. हा हार नॉर्थम्प्टनच्या जवळ शोधण्यात आला आहे. या हाराची खास बाब म्हणजे हा आयाताकार आहे. जो रेड गार्नेट आणि सोबतच सोन्याचा बनला आहे. हा हार एका स्मशानभूमीत सापडला आहे.

तसेच एका कबरेतून दोन डिझायनर भांडी आणि एक तांब्याचं भांड सापडलं आहे. लंडनच्या पुरातत्व संग्रहालयाचे सुपरवायजर म्हणाले की, जेव्हा सोन्याची पहिली झलक मातीतून वर दिसली तेव्हा समजलं होतं की, काहीतरी महत्वाचं असणार आहे. पण हे नव्हतं माहीत की, हे इतकं खास असेल. ते म्हणाले की, अजूनही काही खोदकाम केलं जात आहे. इथे आम्हाला चांदीने तयार करण्यात आलेले मानवी चेहऱ्यांचे काही असामान्य चित्रही सापडले. येथील क्रॉसचा विशाल आकार याकडे इशारा करतो की, दफन करण्यात आलेली महिला एक ख्रिश्चन नेता असावी.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास