(Image Credit : Dawn)
ही आगळीवेगळी घटना आहे बांग्लादेशची. जिथे एका २० वर्षीय महिलेने एक महिन्याच्या आत ३ बाळांना जन्म दिली. ही घटना डॉक्टरांनाही च्रकावून सोडणारी होती. रिपोर्टनुसार, बांग्लादेशच्या या महिलेने आधी एका बाळाला जन्म दिला, त्यानंतर लगेच २६ दिवसांनी ती पुन्हा जुळ्या बाळांची आई झाली. आता डॉक्टर या गोष्टीने हैराण आहेत की, पहिल्या बाळाच्या जन्मावेळी त्यांना हे कळालंच नाही की, तिच्या पोटात जुळे आहेत.
महिलेला दोन गर्भाशय
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचं नाव आरिफा सुल्तान असून तिने २६ दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. ही डिलिव्हरी नॉर्मल होती. आरिफाच्या डॉक्टर डॉ. शीला पोद्दार यांनी सांगितले की, पहिल्या डिलिव्हरीवेळी आम्हाला तिच्या पोटातील जुळ्या बाळांबाबत काहीच कळू शकलं नाही. जेव्हा पोटात दुखण्याची तक्रार करत ती पुन्हा आली तेव्हा आम्ही तिची अल्ट्रासोनोग्राफी टेस्ट केली. ज्यात समोर आलं की, तिच्या पोटात दोन गर्भाशय आहेत.
आतापर्यंत पाहिलं नसं असं....
पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली होती. पण यावेळी डॉक्टरांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. त्यानंतर आरिफाने जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यात एक मुलगी आणि मुलगा आहे. आरिफा तिच्या तिन्ही बाळांसोबत सुखरूप आहेत. सरकारी डॉक्टर दिलीप रॉय यांनी यावर सांगितले की, त्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अशी केस कधी पाहिली नाही.
या सर्व घटनेवर आरिफाचा पती सुमोन म्हणाला की, 'मी मोलमजूरी करून महिन्याला केवळ ६ हजार टका(बांग्लादेशी करन्सी) कमावतो. मला आत्ताच नाही माहीत की, इतक्या कमी पैशात आम्ही कसं घर चालवू, पण माझा हा प्रयत्न राहील की, मी सर्वांना खूश ठेवेल'.