ऑस्ट्रेलियातील (Australia) पर्यटक हैराण झाले आहेत कारण ख्रिसमस बेटावर (Christmas Island) ५ कोटी नरभक्षी खेकडे (Cannibalistic crabs) पुलांवर आणि रस्त्यांवर आले. लाल रंगाचे हे खेकडे समुद्राकडे जात होते, जेणेकरून त्यांना प्रजनन करता यावे. हे खेकडे दरवर्षी जंगलातून निघून नॅशनल पार्कच्या तटावर जातात. असं मानलं जातं की, हा पृथ्वीवरील एखादा जीवाचा सर्वात मोठा प्रवास आहे. ख्रिसमसला हे समुद्र तट खेकड्यांनी पूर्ण लाल दिसतं.
इतक्या मोठ्या प्रमाणात खेकडे पाहून तेथील पर्यटक आणि स्थानिक लोक अवाक् झाले आहेत. त्यांनीच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यादरम्यान पूल, रस्ते, डोंगर आणि सगळीकडे केवळ लाल खेकडे दिसू लागतात. हे सगळे खेकडे प्रजननासाठी समुद्राकडे जातात. ख्रिसमस बेटावर कर्मचारी अनेक महिन्यांआधी इतक्या खेकड्यांच्या स्वागताची तयारी करत असतात.
इतकंच नाही तर खेकड्यांसाठी खासकरून पूल तयार केले जाता आणि अनेक ब्रेकर्सही तयार केले जातात. डॉक्टर तान्या डेट्टोने डेलीमेलसोबत बोलताना सांगितलं की, या भागात २००५ पासून इतक्या मोठ्या प्रमाणात खेकडे प्रवास करतात. त्या म्हणाल्या की, ५ कोटी खेकड्यांना सांभाळण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते जेणेकरून ते त्यांचा प्रवास सुरक्षित करू शकतील.
तान्या म्हणाल्या की, काही खेकडे तर तीन मजली इमारतींवरही चढतात. तज्ज्ञांनुसार, दरवर्षी पावसाळा संपल्यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हे खेकडे प्रजनन करण्यासाठी जातात. या भागात काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यावर नर खेकडे आपल्या घरातून निघतात आणि किनाऱ्याकडे जातात. इथेच त्यांची मादा खेकड्यांसोबत भेट होते.
त्यांनी सांगितलं की, प्रत्येक मादा खेकडा प्रवासादरम्यान हिंदमहासागरात पुढील ५ ते ६ दिवसात १ लाख अंडी देतील. एका महिन्यांनंतर लाल रंगाचे पिल्लं किनाऱ्यावर येतील आणि नंतर जंगलाकडे जातील. समुद्रात लहान खेकडे जास्तकरून मासे किंवा शार्क खातात. जगभरातील पर्यटक हा नजारा बघण्यासाठी दरवर्षी येतात.