शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
2
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
3
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
5
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
6
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
7
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
8
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
9
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
10
इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याची मागणी
11
आणखी एका बँक अधिकाऱ्याची अटल सेतूवरून उडी; पत्नीला शेवटचा मेसेज...
12
बचतीवर व्याज जैसे थे, सर्वसामान्यांना दिलासा
13
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
14
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
15
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
16
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
17
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
19
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
20
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!

OMG! भारतात होते महाकाय डायनासोरचे अस्तित्व; नर्मदा खोऱ्यात सापडले 256 अंड्यांचे जीवाश्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 6:21 PM

मध्य भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात डायनासोरचे जीवाश्म आढळले आहेत.

नवी दिल्ली : पृथ्वीवर काही लाख/कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचे वास्तव्य होते. पण, नंतर घडलेल्या काही नैसर्गिक घटनांमुळे डायनासोर नामशेष होऊन मानव प्रजातीची उत्पत्ती झाली. पण, आजही पृथ्वीवर अनेक ठिकाणी डायनासोरचे अवशेष सापडत असतात. यातच भारतीयांसाठी एक मोठी बातमी आहे.  जगातील काही मोठ्या डायनासोरच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्या भारतात सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. 

संशोधकांनी मध्य भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात एकूण 256 जीवाश्मयुक्त अंडी असलेल्या 92 घरट्यांचा शोध लावला आहे. भारतातील जीवाश्मशास्त्रज्ञांनी मध्य भारतात वनस्पती खाणाऱ्या अवाढव्य आकाराच्या टायटॅनोसॉरसच्या(Titanosaur) वसाहती शोधल्या आहेत. या डायनासोरची 92 घरटी आणि 256 अंडी असलेले जीवाश्म येथे सापडले आहेत. मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात सुरू असलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

PLOS ONE या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधाने भारतीय उपखंडातील टायटॅनोसॉरच्या जीवनाविषयीचे तपशील उघड केले आहेत. मध्य भारतातील नर्मदा खोऱ्यात स्थित लॅमेटा फॉर्मेशन, लेट क्रेटासियस कालखंडातील डायनासोरच्या सांगाड्याच्या जीवाश्मांसाठी आणि अंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरचे अस्तित्वात होते, असे संशोधकांनी सांगितले. या घरट्यांचे तपशीलवार परीक्षण केल्यानंतर दिल्ली विद्यापीठातील संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या डायनासोरच्या जीवन सवयींबद्दल माहिती काढता आली.

घरट्यांच्या मांडणीच्या आधारे टीमचा असा अंदाज आहे की, या डायनासोरनी त्यांची अंडी आधुनिक काळातील मगरींसारखीच उथळ खड्ड्यात पुरली असावीत. संशोधकांनी सांगितले की, ही घरटी अगदी जवळ-जवळ बनवलेली आहेत. त्यांची अंडी 15 सेमी आणि 17 सेमी व्यासाची असून, यात टायटॅनोसॉरसच्या अनेक प्रजाती असू शकतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की हा नवीन शोध जीवाश्म इतिहासातील काही सर्वात मोठ्या डायनासोरबद्दल अधिक महत्त्वाचा डेटा देऊ शकेल.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स