दोन बायकांनी एका पतीची केली अनोखी वाटणी, आठवड्यातील 3 एकीजवळ तर 3 दिवस दुसरीजवळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:08 AM2023-03-14T10:08:24+5:302023-03-14T10:09:28+5:30
ग्वाल्हेर इथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणीचं 5 वर्षाआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. 2 वर्ष पती-पत्नीसोबत राहिले. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं तेव्हा पती पत्नीला तिच्या माहेरी ठेवून गेला.
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक पती आणि दोन पत्नींमध्ये झालेली डील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हरयाणाच्या गुरुग्राममध्ये नोकर करत असलेला सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहित असूनही सोबत काम करणाऱ्या एका तरूणीच्या प्रेमात पडला. अविवाहित असल्याचं सांगत त्याने सोबत काम करणाऱ्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. काही महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने लग्न केलं. इकडे माहेरी असलेली त्याची पत्नी त्याचा शोध घेत गुरुग्राममध्ये पोहोचली. तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीबाबत खुलासा झाला. पत्नी ग्वाल्हेरला येऊन फॅमिली कोर्टात केस दाखल करणार होती. पण काउन्सेलर हरीश दिवाण यांनी दोन महिला आणि पतीला बोलवून काउन्सेलिंगच्या माध्यमातून त्यांच्यात एक करार करून दिला.
3-3 दिवसांची वाटणी
पतीने दोन्ही पत्नीला गुरुग्राममध्ये वेगवेगळे फ्लॅट घेऊन दिले. करारानुसार, पती 3 दिवस एका पत्नीकडे आणि 3 दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार. एक दिवस जेवण पहिल्याकडे करणार तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पत्नीकडे करणार. पती आपला खर्च काढून झाल्यावर उरलेला पगार दोन्ही पत्नींमध्ये समान वाटणार. रविवारी पती त्याच्या मनाचा राजा असेल. दोन्ही पत्नींचा रविवारी पतीवर काही अधिकार राहणार नाही.
ग्वाल्हेर इथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणीचं 5 वर्षाआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. 2 वर्ष पती-पत्नीसोबत राहिले. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं तेव्हा पती पत्नीला तिच्या माहेरी ठेवून गेला. यादरम्यान तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीच्या प्रेमात पडला. स्वत:ला अविवाहित असल्याचं सांगत तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला आणि काही महिन्यांनी त्याने तिच्यासोबत दुसरं लग्न केलं. व्यक्तीला दुसऱ्या पत्नीकडून एक मुलगी झाली. दुसरीकडे लॉकडाऊन संपला तरी घ्यायला आला नाही म्हणून पहिली पत्नी त्याला शोधण्यासाठी आली. तेव्हा तिला त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजलं. दुसऱ्या पत्नीला हे समजल्यावर धक्का बसला. इथे पती आणि दोन पत्नींमध्ये जोरदार भांडण झालं. पहिली पत्नी नाराज होऊन केस करण्यासाठी ग्वाल्हेरमध्ये आली.
पती आणि दोन पत्नींमध्ये अनोखा करार
पहिली पत्नी ग्वाल्हेर फॅमिली कोर्टात पोहोचली आणि आपल्या पती विरोधात केस दाखल करण्याच्या तयारीत होती. या दरम्यान फॅमिली कोर्टाचे काउन्सेलर हरीश दिवाणची भेट तरूणाच्या पहिल्या पत्नीसोबत झाली. हरीश दिवाण यांनी व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला समजावलं आणि पतीसोबतच राहण्याचा सल्ला दिला. महिलेच्या पतीसोबत चर्चा केली तर तो म्हणाला की, महिलेचं वागणं बरोबर नव्हतं. त्यामुळे त्याने सोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत लग्न केलं. व्यक्तीने स्पष्ट शब्दात सांगितलं की, तो दुसऱ्या पत्नीला कोणत्याही स्थितीत सोडणार नाही. हरीश दिवाण यांनी त्यांना समजावून सांगितलं की, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसऱ्या पत्नीला कायदेशीर मान्य मिळणार नाही. पहिली पत्नी केस दाखल करेल आणि अशात त्याची नोकरीही धोक्यात येईल. हे ऐकल्यानंतर पती वेगळा पर्याय निवडण्यासाठी तयार झाला. फोनवरच दुसऱ्या पत्नीला समजावण्यात आलं आणि ती सुद्धा या करारासाठी तयार झाली.
रविवारी पती मनाचा राजा
काउन्सेलर हरीश दिवाणने पती आणि दोन्ही पत्नीमध्ये करार करून दिला. करारानुसार, पतीने गुरुग्राममध्ये दोन्ही पत्नींना एक-एक फ्लॅट घेऊन दिला. पहिली पत्नी आपल्या मुलासोबत फ्लॅटमध्ये राहणार आणि दुसरी पत्नी आपल्या मुलीसोबत फ्लॅटमध्ये राहणार.
आठवड्यातील पहिले 3 दिवस तो पहिल्या पत्नीसोबत राहणार आणि बाकीचे 3 दिवस तो दुसऱ्या पत्नीसोबत राहणार. एक दिवस पहिल्या पत्नीच्या घरी जेवण करणार आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पत्नीच्या दिवशी जेवण करणार. इंजिनिअर पती त्याच्या पगारातून त्याचा खर्च काढणार आणि उरलेले पैसे दोन्ही पत्नींमध्ये समान वाटणार. रविवारी पती एकटा राहणार. रविवारी दोन्ही पत्नींचा पतीवर कोणताही अधिकार किंवा दबाव राहणार नाही.