डोंगराळ भागांत गाड्या (Vehicle) चालवणे हा काही सामान्य खेळ नाही. येथे थोडीशी चूकही आयुष्य संपवू शकते. खरे तर अशा भागांत गाड्या चालवणारे ड्रायव्हर एवढे एक्सपर्ट असतात की, ते अगदी अरुंद रस्त्यांवरूनही अगदी सहजपणे गाड्या वळवू शकतात. ज्या रस्त्यांवर साधी दुचाकी वळवणेही कठीन, त्या रस्त्यांवर हे लोक चारचाकीही अगदी सहजपणे वळतात. सध्या एका अशाच अत्यंत 'हेव्ही ड्रायव्हर'चा (Heavy Driver) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा पराक्रम पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही...!
व्हिडिओमध्ये नेमकं काय?या 27 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे, की एका बाजूला खोल दरी आहे, तर दुसऱ्या बाजुला एक डोंगर आहे. या दोहोंच्या मधून एक अरुंद रस्ता जात आहे आणि या रस्त्यावर एक ड्रायव्हर आपली गाडी वळवत आहे. तो एकटाच आहे. म्हणजेच गाडी वळवण्यासाठी त्याला मदत करणारे कुणीही नाही. तरीही हा ड्रायव्हर गाडीत दोन-तीन वेळा मागे-पुढे करून सहजपणे वळवतो. मात्र, हा ड्रायव्हर जेव्हा गाडी वळवतो तेव्हा त्याच्या गाडीची मागची चाके दरीत जाण्यापासून किंचितशी वाचतात. पण तरीही तो गाडी अगदी सहजपणे वळवतो...
इंटरनेटवर व्हिडिओचा धुमाकूळ -सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटर यूजर @JGnuman197 ने रविवारी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, असे करण्याची एक पद्धत. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 1.4 मिलियन व्ह्यूज, 18.2 हजार लाइक्स आणि 4.3 हजार रीट्वीट्स मिळाले आहेत. याशिवाय ही क्लिप सोशल मिडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरही व्हायरल केली जात आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील लोक अवाक झाले आहेत. शेकडो युझर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनीतर असे कुणी ड्रायव्हर करतो का? हे खरच खरं आहे का? असे सवालही अवेक युजर्सनी केले आहेत.