शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बापरे, मग करायचे काय? कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली म्हणून तुरुंगवास !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 8:22 AM

लोकशाही देशांमध्ये अशी काही घटना घडली असती तर शासनाविरुद्ध आंदोलनं झाली असती. पण ही घटना आहे म्यानमारची.

मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणारी अधिकारी व्यक्ती असो किंवा सध्या छोट्या दुकानात काम करणारा कर्मचारी असो. सगळ्यांनाच पगारवाढ हवी असते. चांगलं काम करत असूनही पगारवाढ नाकारली जात असेल तर तो काम करणाऱ्यांवर अन्यायच. पण कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिल्याने संबंधित व्यक्तीला शासन जर तुरुंगवासाची शिक्षा देणार असेल तर याला काय म्हणायचं? 

लोकशाही देशांमध्ये अशी काही घटना घडली असती तर शासनाविरुद्ध आंदोलनं झाली असती. पण ही घटना आहे म्यानमारची. तिथे लोकनियुक्त सरकारची नाही तर लष्कराची सत्ता आहे. म्यानमारचं जुंटा शासन तेथील लोकांची वाटेल त्या मार्गाने मुस्कटदाबी करत आहे. त्याचंच हे उदाहरण.  पाहिजे तसा धंदा होत नव्हता म्हणून मंडाले येथील  सेलफोन दुकानाच्या मालकाने यू पे फायो झॉ याने कर्मचाऱ्यांना प्रलोभन म्हणून पगारवाढीचे आश्वासन दिले. जर त्यांनी दुकानात चांगला ‘बिझिनेस’ आणला तर दुकानाचा मालक दुकानातील कर्मचाऱ्यांना मोबदला म्हणून पगारवाढ देणार होता. त्या दुकानात काम करणारी माणसं आनंदली. त्यांनी ही बाब फेसबुकवर शेअर करुन लोकांमध्ये पोहोचवली. पगारवाढीची बातमी सर्वत्र पसरताच पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी त्या दुकान मालकाला अटक करत त्याच्यावर कारवाई केली. त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दुकान बंद पडल्याने आणि मालकाला तुरुंगवास झाल्याने आता त्याचा भाऊ, दुकानातले कर्मचारी सगळेच वैतागले आहेत.

एकाच आठवड्यात झाॅसारख्या १० उद्योजकांवरही अशीच कारवाई झाली. कारण त्यांनीही त्यांच्या आस्थापनेत पगारवाढीची घोषणा केली होती. त्यांच्यातील तिघांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. हे वाचून चांगुलपणाचा हा कुठला न्याय? असा प्रश्न कोणालाही पडावा.  पण सध्या म्यानमारची जनता चलन फुगवटा, चलनाचे अवमूल्यन आणि पर्यायाने महागाई आणि आर्थिक संकटाने बेजार झाली आहे. पगारवाढ देण्याच्या घटनेने इतर सामान्य लोकही त्या विक्रेत्यावर तुटून पडले. अशा कृतीने आणखी महागाई वाढणार ही लोकांच्या मनातली भीती. देशातला चलन फुगवटा वाढत चालला आहे आणि याचे सगळ्यांनी भान ठेवावे हा तेथील लष्करी सत्तेचा आग्रह. सगळीकडे निराशेचे वातावरण असताना हा पगारवाढीचा आनंद म्यानमारमधील सत्तेला न चालणारा आणि त्याची शिक्षा म्हणून दुकानाला टाळं लावलं गेलं अन् मालकाला तुरुंगात डांबलं गेलं.

२०२१ मध्ये लष्कराने (जुंटा) म्यानमारची सत्ता ताब्यात घेतली.  तेव्हापासून तेथील जनता आर्थिक संकटाचा सामना करत आहे.  लोक जुंटाच्या धोरणांना आणि परिस्थितीला प्रचंड कंटाळले आहेत. काहीजण बंड करू लागले आहेत. २०२१ पासून म्यानमारची  अर्थव्यवस्था उतरंडीला लागली असून, आता तर तिने अंतिम टोक गाठले आहे. म्यानमारमध्ये या सर्व आर्थिक कोंडीमुळे जनता आपापसात झगडत आहे. बंडखोर लोक  शेतातलं भाताचं उभं पीक पेटवून जुंटाच्या धोरणाविरुद्ध राग व्यक्त करत आहेत. जुंटाच्या धोरणांचा परिणाम म्हणून म्यानमारवर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराचे निर्बंध आहेत. त्यामुळे देशाकडे परकीय चलनाचाही तुटवडा आहे, तर दुसऱ्या बाजूला जुंटा शासनाने १३० मिलियन डाॅलर्सचे शस्त्रास्त्र थायलंडकडून आयात केले आहेत. लष्कराला निधी मिळावा यासाठी लष्करी सत्तेने ३० ट्रिलियन क्याट (म्यानमारचं चलन) छापलं. आज त्याचाच परिणाम म्हणजे म्यानमारमध्ये चलन फुगवटा, वाढती महागाई या समस्यांनी लोक बेजार झाले आहेत. जुंटाने देशातील सर्वच वस्तूंचे दर स्वत: ठरवले आहेत. त्यापेक्षा जर कोणी जास्त दराने काही विकलं की जुंटा सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे.  गेल्या काही आठवड्यांपसून  जुंटा सरकारने मोठ्या प्रमाणावर म्यानमारमधील  तांदूळ उत्पादक, सोन्याचे व्यापारी यांच्यावर भाव वाढवल्याच्या आरोपाखाली कारवाया केल्या आहेत. अशाप्रकारे दर वाढवले, पगारवाढ केली म्हणून अटक करणे हे कायद्यात न बसणारे आहे असे येथील मानवी हक्कासाठी लढणाऱ्या वकिलांचं म्हणणं आहे, पण जुंटा शासनाने कायद्याचे नामोनिशाणच ठेवलेले नाही. त्याचाच परिणाम म्हणजे कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली म्हणून अनेकांना तुरुंगवासाला सामोरं जावं लागत आहे.          

सामान्य जनतेचे हालम्यानमारमध्ये दिवसभरात फक्त चार तास वीज उपलब्ध असते. त्यामुळे म्यानमारचं उत्पादन घटलं. सामान्य जनतेला उन्हाळ्यात दयनीय अवस्थेत जगावं लागलं. उष्माघाताने २५० लोकांचा मृत्यू झाला. देशातली एक तृतियांश जनता दारिद्र्यरेषेखाली जगते आहे. तीन कोटी लोक घाबरून दुर्गम गावात, जंगलात स्थलांतरित झाले आहेत. म्यानमारमधील अनेक तरुण-तरुणी दुसऱ्या देशांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी निघून गेले आहेत.

टॅग्स :jobनोकरी