बटाट्याच्या वेफर्स किंमत असून असून किती असेल? २० रूपये किंवा ३० रूपये...बटाट्याचे वेफर्स हे आजच्या तारखेत सर्वात जास्त विकलं जाणारं प्रॉडक्ट आहे. देशात कितीतरी ब्रॅन्ड्सचे वेफर्स मिळतात. सगळ्यांचं दुकान चांगलं सुरू आहे. पण काय तुम्हाला माहीत आहे की, जगातल्या सर्वात महागड्या बटाट्याच्या चिप्सची किंमत किती आहे?
स्वीडनची कंपनी सेंट एरिक्स ब्रुवरी. जगातले सर्वात महागडे बटाट्याचे चिप्स बनवण्यात या कंपनीचं नाव येतं. खास बाब ही आहे की, या चिप्सच्या पॅकेटमध्ये केवळ ५ चिप्स येतात. तर पूर्ण पॅकेटची किंमत ५६ डॉलर म्हणजेच ३, ९९९३.६४ रूपये आहे. हिशेब केला तर एका चिप्सची किंमत ही ७८४.११ रूपये इतकी होते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे चिप्स इतके महागडे कसे? या चिप्सच्या पॅकेटची पॅकिंग एखाद्या ज्वेलरी बॉक्ससारखीच आहे. त्यात पाच चिप्ससाठी वेगवेगळे खाचे आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर जाल तर पॅकिंग करतानाचे काही फोटो बघायला मिळतील. सेंट एरिक्सचे ब्रॅन्ड मॅनेजर मार्कस फ्रियरी सांगतात की, 'आम्हाला आमच्या कंपनीच्या बीअरसोबत सर्व्ह करण्यासाठी एक खास स्नॅक्स हवं होतं. त्याच स्टेटसचं. आम्ही खूप मेहनत घेतली. जगातले सर्वात एक्सक्लूसिव्ह बटाट्याचे चिप्स तयार केले'.
या खास चिप्समध्ये पाच वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. Matsutake mushrooms, Truffled seaweed, India Pale Ale wort, Crown Dill, Leksand onion, Almond potatoes from the Ammärnas region.
कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, हे चिप्स ज्या प्रकारे तयार करण्यात आले आहेत, त्या वस्तू दुर्मिळ आहे. यात असलेल्या कांद्याची प्रजाती Leksand केवळ Leksand शहरात १८ मे ते १० ऑगस्ट दरम्यान तयार होते. हा कांदा खासप्रकारचा आहे.