रस्त्यानं जाताना अचानक नोटांचा पाऊस पडला तर काय होईल असाच काहीचा प्रकार चीनमध्ये घडला आहे. एका कुटुंबानं त्यांच्या घरातील मुलाच्या वाढदिवशी हवेत नोटांचा पाऊस पाडला. घराच्या बाल्कनीतून उभे राहत कुटुंबाने लाखो रुपयाच्या नोटा हवेत उडवल्या. नोटांचा हा पाऊस पाहून त्याठिकाणी लोकांची गर्दी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यूजर्स यावर विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
Shangyyou न्यूजनुसार, पूर्व चीनच्या अनहुई परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने १६ वर्षीय मुलाच्या वाढदिवशी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मित्रपरिवार, नातेवाईक आणि आसपासच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा सर्व लोक घरातील लॉन्समध्ये जमले होते तेव्हा अचानक कुटुंबातील काही सदस्यांनी बाल्कनीतून नोटा हवेत उडवण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने २०००० युआन म्हणजे २ लाख ४० हजार रुपयाहून अधिक नोटा हवेत उडवल्या. बाल्कनीत कुटुंबातील सदस्य हातात नोटांचा बंडल घेऊन उभे असल्याचं दिसले. काहीजण प्लॅस्टिकच्या टबमध्ये नोटा भरून होते. घराच्या लॉन्समध्ये आमंत्रित लोकांची गर्दी जमली होती. तेव्हा कुटुंबाने बाल्कनीतून नोटा फेकण्यास सुरूवात केली. तेव्हा खाली उपस्थित लोकांनी नोटा पकडण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की सुरू केली.
नोटांचा पाऊस पाहून लोक हैराणज्याने हा नोटांचा पाऊस पाहिला तो हैराण झाला. यांग नावाच्या व्यक्तीनं म्हटलं की, माझ्यावर सर्जरी झाली होती म्हणून मी पैसे उचलले नाहीत. कारण त्या गर्दीत मला दुखापत होण्याची शक्यता होती. व्हिडिओत कुटुंबाचे सदस्य पहिल्यामजल्यावरील बाल्कनीतून पैसे फेकत असल्याचं दिसते. १०० युआनच्या नोटांचे बंडल कुटुंबाच्या सदस्यांच्या हाती होते. एका प्लॅस्टिक बॅगेतून या नोटा बाहेर काढल्या आणि आमंत्रित लोकांवर उधळण्यात आल्या.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर वाद-विवाद सुरू झाला आहे. काही चीनी युजर्सने ही आपली संस्कृती नाही असं म्हटलं तर काहींनी पैसे द्यायचे होते तर सन्मानाने द्यायचे. अनेकांनी कुटुंबाच्या संपत्तीवर भाष्य केले तर या प्रकारामुळे लोकांच्या जीविताला धोका पोहचण्याचीही शक्यता होती अशी भीती काही यूजर्सने व्यक्त केली.