लंडन – जुगाराचा नाद एकदा जडला की आयुष्य उद्ध्वस्त होतं अशी अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. यूनाइटेड किंगडम(UK)च्या एका महिलेच्या आयुष्यातही हेच घडलं. जुगार खेळण्याची सवय इतकी जडली ज्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचसोबत ती कंगालही झाली. या महिलेने तिच्यासोबत घडलेला वाईट अनुभव आता लोकांसोबत शेअर केला आहे.
या महिलेने कॅसीनोमध्ये १ कोटींचे जॅकपॉट जिंकले परंतु त्या दिवसाला ती तिच्या जीवनातील सर्वात वाईट दिवस मानते. महिलेने सांगितले की, जुगार खेळण्यासाठी इतकी वाईट सवय तिला लागली होती. ज्या दिवशी तिचं लग्न त्याच रात्री पहाटे ६ वाजेपर्यंत ती जुगार खेळत होती. द सनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, या महिलेचे नाव लीजा वॉकर असं आहे. लीजाचं वय ४८ वर्ष आहे. जुगार खेळणं हे तिने तिच्या वडील आणि आजोबांकडून शिकली. सुरुवातीला त्या दोघांसोबत ही जुगार खेळत होती. परंतु जेव्हा ती १८ वर्षाची झाली तेव्हा तिने कॅसीनोला जाणं सुरु केले.
एकेदिवशी तिला १ कोटींचा जॅकपॉट लागला
लीजा वॉकर म्हणाली की, फेब्रुवारी २००१ मध्ये Rendevous कॅसीनोमध्ये १ लाख २७ हजार यूरो म्हणजे जवळपास १ कोटी ६ लाख ४७ हजार ९७१ रुपये जिंकले होते. तो तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस सिद्ध झाला. या गोष्टीची जाणीव तिला त्यावेळी झाली नाही. जॅकपॉटमध्ये १ कोटी जिंकल्यानंतर तिला जुगार खेळण्याची सवय जडली आणि कालांतराने ती सातत्याने वाढत गेली. १ कोटी जिंकल्यानंतर ती आठवड्यातून ४-५ दिवस जुगार खेळायला जात होती. ती प्रत्येक वेळी कॅसीनोला ५०० यूरो म्हणजे ४१ हजार घेऊन जायची.
लीजाच्या मते, ती आतापर्यंत ५ लाख यूरो म्हणजे जवळपास ४ कोटी १९ लाख ८ हजार रुपये जुगारात हरली आहे. इतकचं नाही जुगारातील हरलेले पैसे फेडण्यासाठी तिला तिचं घरही विकावं लागलं. महिलेने जुगारात पैसे व संपत्ती पणाला लावली आणि हरली. अखेर जुगारामुळे तिचं दिवाळं निघाल्याचं तिच्या लक्षात आलं. २०१८ मध्ये महिलेने तिचा तिसरा पती गॅरीला समस्येबाबत सांगितले. त्यानंतर गेमकेअर नावाच्या संस्थेशी बोलत जुगाराची सवय मोडून ती इतरांना या सवयीपासून दूर राहण्यासाठी जागरुक करते.