अॅडलेड : जगातील एकूण प्रौढ लोकांपैकी (२४० दशलक्ष) पाच टक्के लोकांना मद्यपानामुळे होणारे विकार असून, २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोक, म्हणजेच १ अब्ज लोक धूम्रपान करतात. अमली पदार्थ टोचून घेणाऱ्या लोकांची संख्या १५ दशलक्ष आहे. व्यसनाधीन लोकांची ही माहिती एकत्र करणे हे आव्हान आहे. पण संशोधक व धोरण तयार करणारे राजकीय नेते यांच्यासाठी ही माहिती अत्यंत मौल्यवान आहे, असे हा अहवाल तयार करणाऱ्या लिंडा गोर्इंग यांनी म्हटले आहे. त्या दक्षिण आॅस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठात सहायक प्राध्यापिका आहेत. ग्लोबल स्टॅटिस्टिक आॅन अॅडिक्टिव्ह बिहेवियर्स - २०१४ चा अहवाल असे नाव असलेल्या या अहवालात विविध देशांतील लोक किती व्यसनी आहेत याची माहिती देण्यात आली आहे. व्यसनासाठी अमली पदार्थ वापरण्याच्या विविध देशातील लोकांच्या सवयी वेगवेगळ्या आहेत, हे या अहवालावरून समजते.पूर्व युरोपमधील लोक जबरदस्त मद्य पितात, त्यांचे मद्यसेवन दरडोई १३.६ लिटर आहे. उत्तर युरोपमधील लोक ११.५ लिटर दारू पितात.आशिया खंडात मद्यपानाचे प्रमाण कमी आहे. केंद्रीय, दक्षिण व पश्चिम आशियात दरडोई मद्यपानाचे प्रमाण २.१ लिटर आहे. (वृत्तसंस्था)
जगात एक अब्ज धूम्रपानकर्ते
By admin | Published: May 13, 2015 10:20 PM