Flipkart सध्या ग्राहकांसाठी बिग दसरा सेल आयोजित करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचेही आयोजन केले होते, जिथे त्यांनी सुमारे 50,000 रुपयांमध्ये iPhone 13 विक्रीसाठी उपलब्ध केला होता. या संधीचा फायदा घेत शेकडो ग्राहकांनी कमी किंमतीत iPhone 13 खरेदी केला. परंतु सेलमध्ये एका ग्राहकाचे नशीब असे चमकले जेव्हा त्याला आयफोन 13 ऐवजी नवा लाँच झालेला आयफोन 14 मिळाला. दसरा सेल दरम्यान iPhone 13 ची किंमत 57,240 रुपये आहे. हे प्रकरण वाचून सर्वांनाच धक्का बसला. पाहूया काय आहे हे प्रकरण.
एका ट्विटर युझरने दावा केला आहे की एक ग्राहक, जो त्याचा सोशल मीडिया फॉलोअर आहे, त्याला सेल दरम्यान आयफोन 13 च्या किमतीत आयफोन 14 मिळाला आहे. युझरने कथित ऑर्डर आणि रिटेल बॉक्सचे स्क्रीनशॉट देखील अपलोड केले आहेत, जे आयफोन 14 चे लेबलिंगची पुष्टीही करतात.
Apple iPhone 13 फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होता. Apple च्या वेबसाइटवर हा फोन 69,900 रुपयांना लिस्ट आहे. असा दावा केला जात आहे की ज्या ग्राहकाने आयफोन 13 ची ऑर्डर दिली होती त्याला कथितपणे आयफोन 14 ची डिलिव्हरी मिळाली. फोटोनुसार ग्राहकाने iPhone 13 साठी 49,019 रुपये दिले. पण ट्विटर युझरने दावा केल्याप्रमाणे फ्लिपकार्टने त्याला नवा आयफोन 14 पाठवला आहे.
या कथित घटनेवर फ्लिपकार्टने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. जर युझरचा हा दावा खरा असेल तर त्याला खरोखरच जॅकपॉट लागला आहे असं म्हणता येईल.