सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन किंवा Find The Object Puzzle सारखे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. लोकांना अशा फोटोंमध्ये फारच इंटरेस्ट असतो. आपला वेळ देऊन लोक फोटोंमधील रहस्य किंवा उत्तर शोधतात. आज आंतरराष्ट्रीय वाघ दिवसानिमित्ताने (International Tiger Day 2021) सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एकापेक्षा जास्त वाघ आहेत. हा फोटो शेअर करून त्यात किती वाघ आहेत हे विचारलं जात आहे.
अनेकांनी या फोटोतील वाघांची संख्या सहजपणे शोधली. पण काही लोकांना अनेक प्रयत्न करूनही या फोटोत किती वाघ आहेत हे सांगणं अवघड होत आहे. त्यांना वाघ मोजण्यात अडचण येत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सूटत नाही तर तुम्हीही ट्राय करा आणि या फोटोत किती वाघ आहे ते सांगा. (हे पण बघा : ढूंढते रह जाओगे! या फोटोतील बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला जमतंय का!)
हा फोटो लोकांना खूपच आवडला आहे. बऱ्याच लोकांनी यावर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'याला म्हणतात परफेक्ट टायमिंगवाला फोटो. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, झाडांच्या मागे वाघ, ते तर मलाही दिसत नाहीये. तुम्हाला जर किती वाघ आहेत हे दिसलं असेल तर कमेंट करायला विसरू नका.