Optical Illusion : आजकाल ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक इमेज तुम्ही पाहिल्या असतील. कोणी ना कोणी त्या अनेकदा शेअर करत असतो. तुम्ही देखील कधीतरी आपल्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना असे फोटो पाठवून त्यांचीही नक्कीच परीक्षा घेतली असले. परंतु आता एक नवं चॅलेंज घेण्याची वेळ आली आहे. असाच नवा फोटो पुन्हा एकदा समोर आला आहे. खाली देण्यात आलेल्या या फोटोवर तुम्ही एकदा नजर टाका आणि किती नावं तुम्ही ओळखू शकता हे तपासा.
आजच्या या फोटोमध्ये राष्ट्रीय नेत्यांचे चेहरे दडलेले आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला एकूण १० चेहरे दिसतील. या फोटोंमध्ये कोणत्या नेत्यांचे चेहरे आहेत हे एका युझरनं सांगितलंय.
राजीव गांधीइंदिरा गांधीडॉ. राधाकृष्णनचंद्रशेखर आजादसुभाष चंद्र बोसरविंद्रनाथ टागोरमहात्मा गांधीगोपाळ कृष्ण गोखलेजवाहर लाल नेहरूलाल बहादुर शास्त्री
परंतु तुम्हाला ती नावं समजलीयेत का? काही लोकांच्या म्हणण्यानुसार नॅशनल लीडर्स ट्रीला १८८० च्या दशकात हार्परच्या एका अज्ञात चित्रकारानं तयार केलं होतं. जर हे खरं असेल तर वरील अंदाज हे चुकीचे असतील. तर एकानं हा फोटो १८८० च्या दशकातला असल्याचं म्हटलं आहे. सूचीमध्ये २० व्या शतकातील कोणतेही नेते भारत किंवा अन्य कोणत्याही ठिकाणचे नाही, असं कमेंट आणखी एका युझरनं केलं आहे. आणखी एकानं मार्गरेट थॅचर आणि मिखाईल गोर्बाचेव यांचे चेहरे या फोटोत असल्याचं दिसत असल्याचं म्हटलंय. चित्रकारही अज्ञात आहे आणि फोटोही जुना असल्यानं यातील नावं स्पष्टपणे सांगणं कठीण आहे.