: सोशल मीडियावर जसे काही फोटो, व्हिडीओज व्हायरल होत असतात तसे काही गेम, क्विझ आणि पझल्सही व्हायरल होतात. बरेच नेटिझन्स ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक फोटो चर्चेत आहे. ज्यामध्ये एक नंबर दडला आहे. हा नंबर शोधण्यात भलेभले लोक फेल झाले आहेत. तुम्हाला तरी जमतं आहे का ते पाहा.
हा एक ऑप्टिकल इल्युशन (Optical Illusion) म्हणजे दृष्टीभ्रम करणारा फोटो आहे. ज्यामध्ये दिसतं एक पण असतं भलतंच. या फोटोत जे काही दडलेलं आहे ते सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही. या फोटोबाबतीतही तसंच आहे. या फोटोत एक काळ्या रंगाचं सर्कल आहे. जे पाहताच तुम्हाला गरगरेलही. या अशा फोटोतून तुम्हाला नंबर शोधायचा आहे. @benonwine नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला यामध्ये नंबर दिसतो आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
हे काळं वर्तुळ नीट पाहा. त्यातील आकडा तुम्हाला दिसला का? बऱ्याच नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण बहुतेक लोक फेल ठरले आहेत. त्यांनी चुकीचा आकडा सांगितला आहे. त्यांचं उत्तर चुकीचं ठरलं आहे. कुणी 3452839, कुणी 528, कुणी 45283 तर कुणी आणखी काही, असे आकडे सांगितले आहेत. तुम्हालाही हे आकडे दिसत असतील तर ते चुकीचे आहेत.
काही मोजक्याच लोकांनी हा योग्य नंबर शोधला आहे. आता या मोजक्या लोकांच्या यादीत तुम्हीसुद्धा येता का ते पाहा. या वर्तुळात दडलेला खरा आकडा आहे तो 3452839. तुमचंही उत्तर हेच असेल तर ते योग्य आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांनाही हे चॅलेंज द्या. पाहा त्यांची नजरही तुमच्यासारखी शार्प आहे की नाही.